Breaking News

औषधालयांचा 30 मे रोजी देशव्यापी संप

नवी दिल्ली, दि. 28 - औषधांच्या विक्रीवर सरकारकरून लावण्यात आलेले कडक नियम शिथिल करावे, या मागणीसाठी 30 मे रोजी एक दिवसाचा देशव्यापी संप पुकारण्यात येणार आहे. ऑल इंडिया ऑर्गनायजेशन ऑफ केमिस्ट अ‍ॅण्ड ड्रगिस्टकडून एक दिवसाचा संप पुकारण्यात आला आहे. 29 मे रोजी रात्री 12 वाजता संपाला सुरूवात होणार असून देशातील सगळी औषधालये बंद असणार आहेत.
ऑल इंडिया ऑर्गनायजेशन ऑफ केमिस्ट अ‍ॅण्ड ड्रगिस्टचर्गत नऊ लाख औषधालये चालवले जातात. ’अनेक वेळा आमच्या तक्रारी सरकारकडे मांडल्या पण त्यावर सरकारने सकारात्मक उत्तर कधीही दिले नाही म्हणूनच आता आम्ही संपावर जाण्याचा निर्णय घेतल्याचे ऑल इंडिया ऑर्गनायजेशन ऑफ केमिस्ट अ‍ॅण्ड ड्रगिस्टच्या वतीने सांगण्यात आले आहे. मेडिकलच्या या संपाची पूर्वसूचना पंतप्रधान कार्यालय, आरोग्य मंत्रालय, गृह मंत्रालय तसंच औषध नियंत्रक कक्षात देण्यात आली आहे.