Breaking News

नगरसेवक हेमंत शेट्टीसह इतरांना 1 जूनपर्यंत पोलिस कोठडी

नाशिक, दि. 28 - खुनाच्या गुन्ह्यातील संशयित जालिंदर उर्फ ज्वाला उगलमुगले याचे अपहरण व खुनातील संशयावरून पंचवटीतील भाजपा नगरसेवक हेमंत आण्णा  शेट्टी, सराईत गुन्हेगार कुंदन परदेशी व राकेश कोष्टी यांना आज प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एम. के. पिंगळे यांनी 1 जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. 1 ऑक्टोबर  2015 जालिंदर बेपत्ता होता. काल रात्री उशिरा पोलिसांनी नगरसेवक हेमंत शेट्टीसह यांच्यासह 6 संशयितांवर खूनाचा गुन्हा रात्री उशिरा दाखल केला.पंचवटीतील  जालिंदर उर्फे ज्वाल्या अंबादास उगलमुगले (वय 23, रा.संजयनगर, पंचवटी) हा 1 आक्टोबर 2015 रोजी रात्री 9 वाजेच्या सुमारास घरातून गायब झाल्यानंतर  त्याचा शोध लागत नव्हता.
दरम्यान त्यावेळी जालिंदरच्या घरच्यांनी पंचवटी पोलीस ठाण्यात हरवल्याची नोंद करून तत्कालीन पोलीस निरिक्षकांची भेट घेवून या प्रकरणात ज्वाल्या यांचा  घातपात झाल्याचा संशय व्यक्त करत तपास करण्याची अनेकवेळा विनंती केली होती.मात्र तत्कालीन पोलीस निरिक्षकांनी याकडे दुर्लक्ष केले होते. मात्र ज्वाल्या यांच्या  घरच्यांनी या घटनेचा पाठपुरावा सुरुच ठेवला. दरम्यान पंचवटी पोलीस ठाण्याच्या कार्यभार पोलीस निरिक्षक दिनेश बर्डेकर यांनी हातात घेतल्यानंतर या प्रकरणात  खासकरून लक्ष घातले होते.
दरम्यान गत आठवड्यात पाथरवट लेन परिसरांत पुर्ववैमनस्यातून वाहनांची तोडफोड झाल्याची घटना झाली. यात पोलिसांनी अविनाश कौलकर व रोहित कडाळे (रा.  संजयनगर, पंचवटी) यांना अटक केली. यात चौकशी सुरु असताना ज्वाल्याचे अपहरण व हत्येच्या कटात देखील त्यांचा सहभाग असल्याचे निष्पन्न झाले. त्यांची  कसून चौकशी केली असता या कटात सराईत गुन्हेगार राकेश कोष्टी, शाम महाजन, कुंदन परदेशी हे देखील सहभागी असल्याचे उघड झाले.