संगमनेर तालुक्यातील शेतकरी 1 जून पासून संपावर; शहरांना भाजी-पाला व दुध बंद
संगमनेर, दि. 27 - शेतकर्यांना सरसकट कर्जमाफी देवून अनेक दिवसांच्या प्रलंबित मागण्या मान्य कराव्यात यासाठी राज्यभरातील शेतकर्यांनी संपावर जाण्याच्या घेतलेल्या निर्णयाला पाठींबा देत संगमनेर तालुक्यातील शेतकर्यांनी 1 जून पासून संपावर जात शहरांना भाजी-पाला व दुध देणे बंद करण्याचे ठरविले आहे.
संगमनेर तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या भवनामध्ये झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. यावेळी बाजीराव खेमनर, अॅड. माधवराव कानवडे, रणजितसिंह देशमुख, किसान क्रांती आंदोलनाचे प्रदेश समन्वयक सतिष कानवडे, रामदास वाघ, सभापती शंकर खेमनर, सभापती सौ. निशाताई कोकणे, भुमिपुत्र संघटनेचे संतोष वांढेकर, शिवाजीराव थोरात, पाडुरंग घुले, संपत डोंगरे, दत्तु खुळे, अविनाश सोनवणे, संपत गोडगे, सौ. अर्चना बालोडे, सौ. शांताबाई खैरे, भारत मुंगसे, रोहिदास पवार, अवधुत आहेर, शरद कोकणे, आर. बी. सोनवणे, रमेश गुंजाळ, जगन आव्हाड, शिवाजी रहाटळ, आदींसह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
रणजितसिंह देशमुख म्हणाले, सध्याचे भाजपा सरकार हे शेतकरी विरोधी व शहरी सरकार आहे. शेतकर्यांना नैसर्गिक संकटांना तोंड देण्याची वेळ येते. यावेळी सरकार फक्त पंचनामे करुन मदतीच्या फसव्या घोषणा करते. जाहिरातबाजीसाठी सरकार करोडो रुपये खर्च करते. मात्र शेतकर्यांना कोणतीही सवलत देत नाही. उत्तर प्रदेशात कर्ज माफी होवू शकते. मग दुष्काळग्रस्त महाराष्ट्रात का होत नाही. सरकारला शेतकर्यांच्या प्रश्नांची जाणीव नसून शेतकर्यांच्या प्रलंबीत मागण्या मान्य करण्यासाठी शेतकर्यांनी एकत्र येवून संप करण्याचा घेतलेला ऐतिहासिक निर्णय हा मैलाचा दगड ठरणार आहे.
सतिष कानवडे म्हणाले, मोदी सरकारने शेतकर्यांचा पुर्णपणे भ्रमनिराश केला आहे. एका बाजूला शेतकरी आत्महत्या करतोय तर दुसर्या बाजूला सरकार एका खासगी कंपनी बरोबर सोशल मिडीयासाठी साडेचार हजार लाखांचा करार करते. समाजातील सर्व घटक, नोकरदार आपल्या मागण्यांसाठी संप करतात. मात्र जगाचा पोशिंदा असलेला बळीराजा मात्र कायम कष्ट करतो. शेतकर्यांनी संपावर जाणे ही आत्तापर्यंतची पहिली घटना आहे. शेतकर्यांच्या न्याय हक्कासाठी माजी कृषी मंत्री काँग्रेस नेते आमदार बाळासाहेब थोरात व आमदार डॉ. सुधीर तांबे यांनी वेळोवेळी सरकारकडे पाठपुरावा केला आहे. येत्या 1 जून पासून सरसकट कर्ज माफी, स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशींची अंमलबजावणी, शेतीमालाला हमी भाव, बिनव्याजी कर्ज पुरवठा, 60 वर्षांनंतर पेंशन, सिंचनासाठी 100 टक्के अनुदान, मोफत विज पुरवठा अशा विविध मागण्यांसाठी संप केला जाणार आहे. तसेच 1 जून पासून शहरांना भाजीपाला व दुध पुरवठा बंद केला जाईल असा इशारा ही त्यांनी दिला. या चर्चेत अॅड. माधवराव कानवडे, रामदास वाघ, शिवाजीराव थोरात, सभापती शंकर खेमनर, दत्तु खुळे, आदिंनी सहभाग घेतला.
संतोष वांढेकर यांनी आभार मानले. संगमनेर तालुक्यातील शेतकर्यांनी या संपात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात आले.