Breaking News

रेशनमधला काळा बाजार आता 100 टक्के थांबणार

सोलापूर, दि. 28 - गेल्या अनेक वर्षांपासून चर्चेत असलेले पॉस मशीन आता रास्त भाव दुकानांमध्ये दाखल झाले आहे. शहरातील 318 तर जिल्ह्यातील 1560  रास्त भाव दुकानांना पॉस मशीनचे (पॉइंट ऑफ सेल) वाटप करण्यात आले आहे. जूनपासून ज्या कुटुंबांचा आधार क्रमांक शिधापत्रिकेशी लिंक आहे, त्यांनाच धान्य  मिळणार आहे. कुटुंबप्रमुख असलेल्या नागरिकाने मशीनवर अंगठा लावल्यानंतरच दुकानातून धान्य देण्यात येणार आहे. यामुळे रेशन धान्याचा होणारा काळा बाजार  आता 100 टक्के थांबणार आहे. गेल्या ते 10 वर्षांपासून संगणकीय शिधापत्रिकेची फक्त चर्चाच सुरू होती. अखेर 1 जूनपासून सर्व दुकानांमध्ये पॉस मशीनद्वारे धान्य  वाटप करण्यास सुरुवात होणार आहे. आधार क्रमांकाची लिंक असलेल्या कुटुंबालाच धान्य देण्यात येणार आहे. याबाबत नागरिकांना जून महिन्याची मुदत दिली आहे,  या मुदतीत आधार क्रमांक लिंक केल्यास जुलैपासून धान्याचे वितरण करण्यात येणार नसल्याचे जिल्हा पुरवठा कार्यालयाने स्पष्ट केले आहे. यातून रेशन धान्यातील  गैरप्रकार थांबणार आहे.