तूर खरेदी केंद्रांवर दोन दिवसात बारदाना उपलब्ध होणार
मुंबई, दि. 06 -राज्यातील तूर खरेदी केंद्रांवर दोन दिवसांत बारदाना उपलब्ध होणार आहे. नाफेडमार्फत सध्या 9 लाख 20 हजार बारदाना खरेदी करण्यात आला आहे. कृषीमंत्री पांडुरुंग फुंडकर यांनी आढावा बैठकीनंतर ही माहिती दिली. मंत्रालयात कृषीमंत्र्यांच्या दालनात राज्यातील तूर खरेदीसंदर्भात आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी सहकार आणि पणन मंत्री सुभाष देशमुख उपस्थित होते.
तूर खरेदी केंद्रांवरील तुरीची त्वरीत उचल करावी. तोपर्यंत नव्याने तूर खरेदी प्रक्रिया स्थगित ठेवावी. खरेदी केंद्रांवरील संपूर्ण तुरीची उचल झाल्यानंतर खरेदी प्रक्रिया पुन्हा सुरु करावी. शेतकरी उत्पादक कंपन्यांना तूर खरेदीची मर्यादा वाढवून देण्यासंदर्भात केंद्र सरकारने सकारात्मकता दाखवली आहे, असं पांडुरंग फुंडकर यांनी सांगितलं. राज्यातील तूर खरेदीचा आढावा घेऊन बारदाना अभावी ज्या ठिकाणी खरेदी केंद्र बंद आहे, ते तातडीने सुरु करावे, असे निर्देश नाफेड, अन्न महामंडळ, विदर्भ सहकारी महामंडळाच्या अधिकार्यांना देण्यात आले आहेत. राज्यात 31 लाख क्विंटल तुरीची खरेदी झाली आहे. ती गेल्या 15 वर्षांतील विक्रमी असल्याचं पांडुरंग फुंडकर यांनी सांगितलं.