राम नवमीला विनापरवानगी मिरवणूक, नगरमध्ये 60 जणांवर गुन्हे दाखल
अहमदनगर, दि. 06 - अहमदनगरमध्ये रामनवमीला विनापरवानगी मिरवणूक काढल्यानं 60 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हिंदू राष्ट्र सेनेच्या पदाधिकार्यांसह भाजपच्या लोकप्रतिनिधींचाही यात समावेश आहे. रामनवमीला 300 जणांना प्रतिबंधात्मक नोटीस बजावण्यात आली होती. उत्सव काळात शहरात प्रवेश करण्यास मनाई केली होती. मात्र, मिरवणुकीत हिंदू राष्ट्र सेनेच्या पदाधिकार्यांनी सहभाग घेतला होता.
भाजपचे उपमहापौर, खासदार दिलीप गांधींचे नगरसेवक पुत्र सुवेंद्र आणि शहराध्यक्षांनी कार्यकर्त्यांना मिरवणुकीला प्रोत्साहन दिल्यानं गुन्हा दाखल करण्यात आला आहे. माळीवाडा बसस्थानकातातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळयापासून मंगळवारी सायंकाळी मिरवणूक निघाली. मुख्य बाजारपेठेतून दिल्ली गेटला पारंपारिक वाद्य वाजवत मिरवणूक काढली होती.