Breaking News

गणेशउत्सव सजावट स्पर्धा 2016 बक्षीस वितरण संपन्न

बुलडाणा, दि. 15 - दि. 13 एप्रिल 2016 रोजी बुलडाणा येथील रेणुका मंगल कार्यालयात दुपारी 3 वा. महाराष्ट्र राज्य सांकृतिक कार्य संचालनालय मुंबई द्वारा आयोजित गणेशउत्सव सजावट स्पर्धा 2016 बक्षीस वितरण सोहळा  संपन्न झाला. या स्पर्धेत तालुकास्तर व जिल्हास्तर या दोन गटात प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकाचे बक्षीस देण्यात आले.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान मा.सोनवणे साहेब, शिक्षणाधिकारी (माध्यमिक) जिल्हा परिषद बुलडाणा यांनी भूषविले तर प्रमुख अतिधी म्हणून मा. राजेंद्र चित्तलवार मुख्यलेखाधिकारी सहाय्यक संचलक, सांकृतिक कार्य संचालनालय, विभागीय कार्यालय नागपूर, मा. अप्पाजी तोडकर खामगाव तसेच मा. काळूसे साहेब उपशिक्षणाधिकारी (माध्यमिक) जिल्हा परिषद बुलडाणा लाभले.
कार्यक्रमाचे प्रास्थाविक जिल्हा समन्वयक श्री. विजय सोनोने यांनी केले तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जिल्हा समन्वयक श्री. लक्ष्मीकांत गोंदकर यांनी केले. सर्व विजेत्या गणेश मंडळास स्मृतीचिन्ह, प्रमाणपत्र व रक्कम धनादेश  देण्यात आले. या स्पर्धेतील तालुका स्तरावरील विजेते गणेश मंडळ खालीलप्रमाणे मोताळा तालुका प्रथम बक्षीस नवयुवक सार्वजनिक गणेश मंडळ, पान्हेरा खेडी. बुलडाणा तालुका प्रथम रुद्र गणेश मंडळ, द्वितीय सार्वजनिक गणेश मंडळ, देऊळघाट, शेगाव तालुका प्रथम लिओ गणेश मंडळ द्वितीय न्यूभारत गणेश मंडळ, तृतीय संभाजी ब्रिगेड गणेश मंडळ, देऊळगावराजा तालुका प्रथम वाथ्री तेली गणेश मंडळ,द्वितीय रुद्र्काल गणेश मंडळ,तृतीय श्री चौडेश्‍वरी गणेश मंडळ, मेहकर तालुका प्रथम शिव चंद्र गणेश मंडळ, द्वितीय गणराज गणेश मंडळ, तृतीय शिवाजी गणेश मंडळ, लोणार तालुका गणराज गणेश मंडळ, चिखली तालुका प्रथम सहकार्य गणेश मंडळ, द्वितीय नीलकमल गणेश मंडळ, तृतीय महात्मा फुले गणेश मंडळ, खामगाव तालुका प्रथम श्री तानाजी व्यायाम शाळा गणेश मंडळ, द्वितीय लक्ष्मी नारायण गणेश मंडळ, तृतीय वीर हनुमान गणेश मंडळ, जळगाव जामोद तालुका प्रथम जय बजरंग गणेश मंडळ, मलकापूर तालुका प्रथम लेवा नवयुवक गणेश मंडळ, द्वितीय विश्‍वास गणेश मंडळ, तृतीय किसान गणेश मंडळ यांना बक्षीस वितरण करण्यात आहे. बुलडाणा जिल्हास्तरावर प्रथम श्री तानाजी व्यायाम शाळा गणेश मंडळ खामगाव, द्वितीय शिवचंद्र गणेश मंडळ मेहकर तर तृतीय सहकार्य गणेश मंडळ चिखली या गणेश मंडळास बक्षीस वितरीत करण्यात आले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी श्री संतोष सोनुने, सोयगाव येथील जिल्हा परिषद शिक्षक, श्री गजानन पवार, पान्हेराखेडी येथील जिल्हा परिषद शिक्षक तसेच श्री वायाळकर शिक्षणविभाग जिल्हा परिषद बुलडाणा यांनी परिश्रम घेतले.