दिग्गज क्रिकेटपटूंची सन्मान, मात्र द्रविडची अनुपस्थिती चर्चेचा विषय
हैदराबाद, दि. 06 - इंडियन प्रीमियर लीगच्या दहाव्या मोसमाची मोठ्या दिमाखात सुरुवात झाली. हैदराबादच्या राजीव गांधी स्टेडियमवर सलामीच्या सामन्याआधी उदघाटन सोहळा संपन्न झाला. विराट कोहलीसह आयपीएलच्या आठही संघांचे कर्णधार त्यावेळी स्टेडियममध्ये अवतरले. या सोहळ्यात अॅमी जॅक्सनच्या अदाकारीनं रंगत भरली. अॅमीनं तम्मा तम्मा आणि काला चश्मा अशा गाण्यांवर नृत्य सादर केलं. तर यंदाच्या मोसमात आयपीएलच्या यजमान शहरांतील प्रत्येक स्टेडियमवर स्वतंत्र उदघाटन सोहळ्यांचं आयोजन केलं जाणार आहे.
हैदराबादच्या उदघाटन सोहळ्याच्यानिमित्तानं सचिन तेंडुलकर, सौरव गांगुली, व्हीव्हीएस लक्ष्मण आणि वीरेंद्र सेहवाग या दिग्गज भारतीय क्रिकेटवीरांचा सन्मानही करण्यात आला. भारताचा माजी कर्णधार राहुल द्रविडलाही या सोहळ्यात सन्मानित केलं जाणार होतं. पण दिल्ली डेअरडेव्हिल्सच्या प्रशिक्षकपदाच्या जबाबदारीत व्यस्त असल्यानं द्रविड हैदराबादमध्ये उपस्थित राहू शकला नाही.