’विस्डेन’कडून कोहलीला लीडिंग क्रिकेटरचा मान!
मुंबई, दि. 06 - टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेलाय. विस्डेन या क्रिकेटचा धर्मग्रंथ म्हणून ओळखल्या जाणार्या मसिकानं कोहलीची 2016 सालचा लीडिंग क्रिकेटर म्हणून निवड केली आहे. कोहलीनं 2016 साली कसोटी क्रिकेटमध्ये 75.93च्या सरासरीनं 1,215 धावा केल्या होत्या. त्यानं यादरम्यान दहा वन डे सामन्यांत 92.37 च्या सरासरीनं 739 धावा केल्या होत्या.
तर ट्वेन्टी 20 क्रिकेटमध्ये विराटनं गेल्या वर्षी 106.83च्या सरासरीनं 641 धावा कुटल्या होत्या. त्यामुळं 2017च्या वार्षिक अंकावरही विस्डेननं विराटला स्थान दिलं होतं. आता विस्डेनचा लीडिंग क्रिकेटर म्हणून त्याची निवड झाली आहे. ऑस्ट्रेलियाची एलिस पेरी लीडिंग वूमन क्रिकेटर ठरली आहे. त्याशिवाय विस्डेननं निवडलेल्या 2016 सालच्या पाच प्रभावशाली क्रिकेटर्समध्ये पाकिस्तानचे मिसबाह उल हक आणि युनूस खान तसंच इंग्लंडचे बेन डकेट, ख्रिस वोक्स आणि टोबी रोलँड जोन्सचा समावेश आहे.