पिंपरीत भाजप आमदाराच्या मुलीची बोटं कापली!
पिंपरी चिंचवड, दि. 03 - पिंपरी चिंचवडमध्ये एका विद्यार्थ्याने भाजप आमदाराच्या मुलीवर प्राणघातक हल्ला केला. या हल्ल्यात अश्विनी संजीवरेड्डी बोदकुरवारच्या हाताची बोटं कापली आहेत. सुदैवाने ती बोटं शरीरापासून वेगळी झाली नाहीत. अश्विनी संजीव रेड्डी बोदकुरवार ही यवतमाळमधील वणीचे आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांची मुलगी आहे.
वाकडमध्ये आज सकाळी आठच्या सुमारास ही घटना घडली. अश्विनी बोदकुरवार बालाजी सोसायटीमधून बाहेर निघताना आरोपीने तिच्यावर धारदार शस्त्राने हल्ला केला. या हल्ल्यात मुलीची बोटं कापली. यानंतर वाकड पोलिसांनी आरोपी राजेश बक्षीला ताब्यात घेतलं आहे. एकतर्फी प्रेमातून हा हल्ला झाल्याचा संशय वर्तवण्यात येत आहे. दरम्यान, अश्विनी बोदकुरवारला उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. अश्विनी बोदकुरवार आणि आरोपी राजेश बक्षी ताथवडे गावातील बालाजी इन्स्टिट्यूट ऑफ मॉडर्न मॅनेजमेंटमध्ये शिकत आहेत.