Breaking News

कृषि यांत्रिकीकरण योजनेचा लाभ घ्यावा

बुलडाणा, दि. 23 - कृषि यांत्रिकीकरणास मोठया प्रमाणावर चालना देण्याचे राज्य शासनाचे धोरण आहे.कृषि उन्नती योजनेअंतर्गत कृषि यांत्रिकीकरण उपअभियान सन 2017-2018 अंतर्गत अभियानामध्ये इच्छुक लाभार्थ्यांनी लाभ घेण्यासाठी  संबंधित तालुका कृषि अधिकारी  यांचेशी संपर्क साधुन विहीत नमुन्यातील मागणी अर्जासह ट्रॅक्टर,पॉवर टीलर,रिपर कम बाइंडर, कापुस श्रेडर, मिस्ट ब्लोअर, चाफ कटर,रोटाव्हेटर,पेरणीयंत्र, मल्टी क्रॉप थ्रेसर, बीबीएफ प्लांटर,दालमील, पलटी फाळ नांगर, इ.उपकरणांसाठीचा प्रस्ताव सादर करावा.
सदर उपकरणासाठी अनुदान तपशील पुढीलप्रमाणे आहे.
जिल्ह्यास प्राप्त होणार्‍या निधी लक्षांकाच्या मर्यादेत लाभार्थ्यांची निवड करण्यात येईल,अर्ज सादर करण्यासाठी वीस दिवसांचा अवधी देण्यात येईल.ट्रॅक्टरचलीत यंत्रांकरीता ट्रॅक्टर असल्याबाबतचा पुरावा म्हणुन आर.सी.बुक सादर करावे,अर्ज विहीत नमुन्यातच सादर करावा,सदर अर्ज कृषि विभागाच्या संकेत स्थळावर उपलब्ध करुन देण्यात आला आहे. केंद्र व राज्य शासनाच्या अधिकृत सक्षम तपासणी संस्थांनी ज्या यंत्र /औजारांचे रितसर परीक्षण करुन ते बी.आय.एस. अथवा अन्य सक्षम संस्थांनी निश्‍चीत केलेल्या प्रमाणकानुसार /तांत्रीक निकषानुसार असल्याचे प्रमाणित केलेले असेल,त्याच यंत्र /औजारांची खुल्या बाजारातुन खरेदी करीता अनुदान देण्यात येईल,देयके सादर करतांना त्याचे प्रमाणपत्र /तपासणी अहवाल सादर करणे बंधनकारक आहे. सदर बाबींसाठी अनुसुचित जाती,अनुसुचित जमाती, अल्प ,अत्यल्प व महीला यांचेकरीता एकुण यंत्र/औजाराच्या किंमतीकरीता 50 टक्के व सर्वसाधारण प्रवर्गासाठी एकुण यंत्र/ औजाराच्या किंमतीच्या 40 टक्के किंवा सदरील  औजारांच्या उच्चतम मर्यादा यापैकी जे कमी असेल ते अनुदान देय राहील,तरी इच्छुक लाभार्थ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा,असे जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी यांनी प्रसिध्दीपत्रकान्वये कळविले आहे.