Breaking News

विश्‍वस्त संस्थाचे डीजीटायझेशन करा - न्यायमुर्ती तातेड

बुलडाणा, दि. 23 - विश्‍वस्त संस्थाचे डीजीटायझेशन होणे अंत्यत गरजेचे आहे. जेणेकरुन तळागाळातील व्यक्तींना संस्था नोंदणीकरणाच्या अडचणी येणार नाहीत. शासनाच्या योजना सर्वतोपरी जनतेपर्यत पोहचवा,त्यासाठी प्रसार माध्यमांची मदत घ्यावी असे प्रतिपादन न्यायमुर्ती कमलकिशोर क. तातेड यांनी केले.सहाय्यक धर्मादाय आयुक्त बुलडाणा आणि बुलडाणा अर्बन चॅरीटेबल सोसायटी बुलडाणा यांचे संयुक्त विद्यमाने आज सकाळी 10.30 वाजता विश्‍वस्त परीषद आणि चर्चासत्राचे आयोजन बुलडाणा रेसीडेन्सी क्लब, मलकापुर रोड येथे करण्यात आले.
त्याप्रसंगी न्यायमुर्ती कमलकिशोर क. तातेड बोलत होते. यावेळी व्यासपिठावर राज्याचे धर्मादाय आयुक्त शशीकांत सावळे, धर्मदाय सहआयुक्त अमरावती ए.एस.राजंदेकर, बुलडाणा बार असोसिएशनचे अध्यक्ष विजय सावळे, बुलडाणा अर्बन चॅरीटेबल सोसायटीचे अध्यक्ष राधेश्यामजी चांडक उपस्थित होते.
राज्याचे धर्मदाय आयुक्त शशीकांत सावळे यांनी सांगीतले की,  विश्‍वस्त संस्थाचे सांस्कृतिक संघटन होणे फार गरजेचे असुन डीजीटायझेशनला खुप महत्वाचे आहे, ज्यामुळे न्यायीक प्रकरणांमध्ये पारदर्शकता येईल.संस्थाच्या विकासासाठी विशेष अभियान, कार्यशाळा, शिबीरे, आयोजित करावी अश्या सुचना त्यांनी यावेळी दिल्या. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सहाय्यक धर्मदाय आयुक्त शैलेश बाफना यांनी केले. त्यांनी धर्मदाय संस्थांच्या प्रगतीशील कामांची थोडक्यात माहीती दिली.
धर्मदाय सहआयुक्त ए.एस.राजंदेकर यावेळी म्हणाले की, विश्‍वस्त संस्थाच्या अडचणी दुर करण्यासाठी धर्मदाय न्यास नोंदणी आयुक्तालय नेहमीच बांधीत असते, यावेळी त्यांनी निकाली काढलेल्या प्रकरणांचा आढावा सुध्दा घेतला. अंजली मिसाळ यांनी  विश्‍वस्त संस्थांची ऑनलाईन नोंदणी प्रक्रीयेचे सादरीकरण करुन दाखवीले. तसेच मीनल काकोनकर यांनी धर्मदाय आयुक्तालयाच्या अधिन्सत येत असलेल्या धर्मदाय रूग्णालयांची विस्तृत माहीती दिली. तसेच या रुग्णालयामध्ये संपुर्ण महाराष्ट्रात मोफत व सवलतीच्या दरामध्ये उपचार केले जातात, असे सांगीतले.
धर्मदाय उपआयुक्त  भरत व्यास यांनी यावेळी आयुक्तालयाअंतर्गत  विकास कामे , कर्मचारी पदभरती, अनुकंपा भरती, विभाग निहाय, जिल्हानिहाय निकाली प्रकरणे, विभागीय चौकशी प्रकरणे आदींची आढावा यावेळी घेतला.
बुलडाणा अर्बन चॅरीटेबल सोसायटीचे अध्यक्ष राधेश्यामजी चांडक बोलतांना म्हणाले की, धर्मदाय आयुक्तालय अंतर्गत लोकअदालतींचे  आयोजन करण्यात यावे, तसेच विश्‍वस्त धर्मदाय संस्थाना शासकीय योजनांची माहिती व्हावी यासाठी प्रयत्न करावेत. काही संस्था, पतसंस्था ह्या अनुदानाअभावी डबघाईस आल्या आहेत, त्यांच्यासाठी विलीनीकरणाची नियमावली तयार करावी जेणेकरुन संस्था नोंदणीकरण व नुतनिकरण प्रक्रीया सुलभ होईल.
कार्यक्रमाचे संचलन श्रीमती सावळे यांनी केले तर आभार प्रदर्शन सहाय्यक धर्मदाय आयुक्त् निलीमा वानखडे यांनी केले. यादरम्यान धर्मदाय आयुक्तालयामार्फत तयार करण्यात आलेल्या लघु चित्रफिती सुध्दा दाखविण्यात आल्या. कार्यक्रमास कार्यालय अधिक्षक श्री.कायते तसेच सहा.धर्मदाय आयुक्त कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी, संस्थाचे विश्‍वस्त, विविध विभागातील पदाधिकारी, अधिकारी व कर्मचारी यांची मोठया प्रमाणात उपस्थिती होती.