स्त्री भ्रूण हत्या रोखण्यासाठी गर्भलिंग निदान चाचणी अनिवार्य?
मुंबई, दि. 09 - महाराष्ट्रात गर्भलिंग निदान चाचणी अनिवार्य होण्याची शक्यता आहे. स्त्रीभ्रूण हत्या रोखण्यासाठी गर्भलिंग चाचणी आवश्यक करण्याचा प्रस्ताव लोकलेखा समितीनं मांडला आहे. विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनच्या अखेरच्या दिवशी हा प्रस्ताव मांडण्यात आला. खरं तर, स्त्रीभूण हत्या रोखण्यासाठीच कायद्यानुसार गर्भलिंग निदान चाचणीवर बंदी आहे. या नियमाचं उल्लंघन करणार्यांसाठी शिक्षेची तरतूदही आहे. स्त्री अर्भक असल्यास गर्भातच भ्रूण हत्या होत असल्याची अनेक उदाहरणं गेल्या काही वर्षांत सातत्याने समोर येत आहेत. मात्र आता हीच चाचणी अनिवार्य करण्याची मागणी होत आहे.
गर्भवती मुलीला जन्म देणार असल्यास सोनोग्राफीच्या वेळी तिची नोंद करुन, मुलीचा जन्म होईपर्यंत तिची देखरेख करण्याची तरतूद प्रस्तावात करण्यात आली आहे. मुलगी असल्यास गर्भपात होत नाही ना, यावर लक्ष ठेवण्याचं प्रस्तावात सुचवलं आहे. स्थानिक पातळीवर गर्भवती आणि तिच्या पतीचा फॉलो अप घ्यावा. त्यांनी चेकअपला गैरहजेरी लावल्यास त्यांच्या घरी जावं, असं म्हटलं आहे. काँग्रेस आमदार गोपालदास अग्रवाल यांच्या अध्यक्षतेखालील समितीने ही मागणी उचलून धरली आहे. 2010 मध्ये महाराष्ट्रात एक हजार मुलांमागे 854 मुली होत्या. 2011 मध्ये हा आकडा 861 वर गेला. तर 2014 मध्ये एक हजार मुलांमागे 919 मुलींची नोंद आहे. गेल्या महिन्यात सांगलीतील म्हैसाळमध्ये 19 स्त्री भ्रूणांची हत्या झाल्याची घटना समोर आल्यानंतर सरकारने गांभीर्याने पावलं टाकण्यास सुरुवात केली आहे.