Breaking News

सुरेश रैनानं घेतला अफलातून झेल

राजकोट, दि. 15 - पुण्याविरुद्धच्या मॅचमध्ये गुजरात लायन्सचा कॅप्टन सुरेश रैनानं अफलातून कॅच पकडला आहे. प्रवीण कुमारच्या बॉलिंगवर रैनानं स्लिपमध्ये अजिंक्य रहाणेचा हा जबरदस्त कॅच पकडला.
या मॅचमध्ये टॉस जिंकून गुजरातनं पहिले बॉलिंगचा निर्णय घेतला. 20 ओव्हरमध्ये पुण्याला 171 रन्सपर्यंत मजल मारता आली. गुजरातच्या अ‍ॅन्ड्र्यू टायनं या मॅचमध्ये हॅट्रिक घेतली. आपल्या 4 ओव्हरमध्ये टायनं 17 रन्सच्या मोबदल्यात पुण्याच्या 5 बॅट्समनना पॅव्हेलियनमध्ये पाठवलं.