Breaking News

रामेश्‍वर येथे विश्‍वधर्मी श्रीराम-रहीम मानवता सेतूच्या लोकार्पर्ण सोहळा

विश्‍वमर्धी श्रीराम-रहीम मानवता सेतूत वैश्‍वीक एकात्मतेची ताकद-डॉ. भटकर 

लातूर (प्रतिनिधी), दि. 05 -  आपली संस्कृती एम वैश्‍वीक संस्कृती आहे. या संस्कृतीमध्ये सर्व धर्मांचा गाभा व तत्वे समाविष्ठ आहेत. रामेश्‍वर येथे विश्‍वधर्मी श्रीराम-रहीम मानवता सेतू माझ्या दृष्टीने जगातील सर्वात सुंदर सेतू आहे. कारण या सेतूव्दारे विश्‍वशांती प्रस्थापीत केली जाईल. सनातन धर्माचे दर्शन आयोध्येत होते. मात्र त्याचा प्रत्येय मला रामेश्‍वर येथे उभारण्यात आलेल्या मानवता सेतूला पाहून येत आहे. या सेतूमध्ये विश्‍वाला एक करण्याची ताकद आहे असे मत जगविख्यात संगणक तज्ञ व नालंदा विद्यापीठाचे कुलपती पद्मभूषण डॉ. विजय भटकर यांनी व्यक्त केले.
विश्‍वशांती केंद्र (आळंदी), माईर्स एमआयटी पुणे भारत तर्फे लातूर तालुक्यातील रामेश्‍वर (रुई) येथील सोनावळा नदीवर उभारण्यात आलेल्या विश्‍वशांती, मानवता आणि विश्‍वबंधुत्वाचा संदेश देणार्‍या विश्‍वधर्मी श्रीराम-रहीम मानवता सेतूचे श्रीरामनवमीचे औचीत्य साधुन लोकार्पर्ण केले गेले, या सोहळयाच्या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते.
यावेळी लातूरचे पालकमंत्री ना. संभाजीराव पाटील निलंगेकर, लातूरचे खासदार डॉ. सुनिल गायकवाड, माजी केंद्रीय मंत्री डॉ. आरीफ महम्मद खान, वरीष्ठ पत्रकार डॉ. वेदप्रताप वैदिक, फिरोज बख्त अहेमद, नोबेल पारीतोषीक विजेते डॉ. राजेंद्र शेंडे, माजी खा. डॉ. गोपाळराव पाटील, डॉ. अशोक कुकडे, पं. वसंतराव गाडगीळ,  ङ सिराज कुरेशी हे सन्मानीय पाहूणे म्हरणून उपस्थित होते.
विश्‍वशांती केंद्र (आळंदी), माईर्स एमआयटीचे संस्थापक आध्यक्ष प्रा. डॉ. विश्‍वनाथ दा. कराड, नागपूर विद्यापीठाचे माजी कुलगुरु एस. एन. पठाण, श्री तुळशीराम दा. कराड, श्री काशीराम दा. कराड, माईर्स एमआयटीचे उपाध्यक्ष प्रा. राहुल विश्‍वनाथ कराड, माईर्स एमआयटीचे सचिव प्रा. डॉ. मंगेश तु. कराड, एमआयएमएसआर वैद्यकीय महाविद्यालयाचे कार्यकारी संचालक  रमेश्अप्पा कराड, डॉ. सुचीत्रा कराड-नागरे, सौ. ज्योती कराड-ढाकणे आदी उपस्थित होते. थोर तपस्वी व साधक परमपूज्य श्री श्रीकृष्ण कर्वे गुरुजी यांनी यावेळी शुभाशीर्वाद दिले.
डॉ. विजय भटकर म्हणाले, इंडोनेशीयासारख्या मुस्लीम बहुल देशातही रामाची विधीवत पूजा केली जोते. तसेच रामकथा सांगीतली जोते. रामाला मर्यादा पुरुषोत्तम असे म्हटले जाते. कारण श्रीराम फक्त हिंदू धर्मातच तव्हे तर संपूर्ण विश्‍वात पूजनीय आहेत. या विश्‍वधर्मी श्रीराम-रहीम मानवता सेतूच्या माध्यमातून संपूर्ण विश्‍वात शांती प्रस्थापीत करण्यात मदत होईल. हा सेतू सर्वधर्माचा सार व गाभा आहे. आयोध्या येथे सुध्दा अशाच प्रकारचा विश्‍वधर्मी श्रीराम मानवता भवन उभारल्यास हिंदू-मुस्लीम एैक्य तर साधले जाईलच परंतू सर्व समाजामध्ये शांती प्रस्थापीत होईल.
पालकमंत्री ना. संभाजीराव पाटील निलंगेकर म्हणाले की, विश्‍वधर्मी श्रीराम-रहीम मानवता सेतू दोन्ही समाजाला जोडणारा हा सेतू एक आदर्श आहे. श्रीराम व रहीम हे दोघे वेगळे नसून दोघामधील तत्व सारखेच आहेत. या सेतूच्या माध्यमातून समाजामध्ये एकतेचा संदेश जात आहे. कराड कुटूंबीयांनी उचललेले हे पाऊल विश्‍वशांतीच्या मार्गाने जात आहे. आरीफ महम्मद खान म्हणाले की, माझ्या देशाच्या सनातन परंपरेला माझा सलाम आहे. ज्या परंपरेने मला श्रीराम, हजरत जैन्नुदिन चिस्ती या दोघांच्याही पायावर डोक ठेवण्याची ताकद दिली. ही परंपराच तितकी प्रभावशाली आहे. पत्रकार डॉ. वेदप्रताप वैदिक म्हणाले की, राजा बनने, प्रधान व मंत्री बनने फारसे अवघड नाही मात्र विश्‍वधर्मी श्रीराम-रहीम मानवता सेतू सारखे चिरंतन कार्य होणे फार कठीण असते. हे कठीण काम रामश्‍वर येथे साकारत आहे
प्रा. डॉ. विश्‍वनाथ दा. कराड म्हणाले की, विश्‍वधर्मी श्रीराम-रहीम मानवता सेतू हा वैश्‍वीक एकात्मतेसाठी उचललेले एक महत्वपूर्ण पाऊल आहे. हा सेतू म्हणजे हिंदू-मुस्लीम ऐक्याचे प्रतिक आहे. रामेश्‍वर येथील सोनावळा नदीच्या एका बाजूस संत श्री गोपाळबुवा महाराज तर दुसर्‍या तिरावर हजरत जैन्नुदीन चिस्तीचा दर्गा आहे. या दोन संतांना जोडणारा सुतू हा महत्वाचा दुवा आहे.  
या सोहळयात माजी केंद्रीय मंत्री डॉ. आरीफ महम्मद खान व वरीष्ठ पत्रकार डॉ. वेदप्रताप वैदिक यांना ‘समर्पित जीवन गौरव पुरस्कार’ देवून सन्मानीत करण्यात आले. सन्मानपत्र, स्मृतीचिन्ह, शाल व श्रीफळ असे या पुरस्काराचे स्वरुप होते. सोबतच केरळ येथील बेना फातीमा व रामेश्‍वर येथील फरजाना युसुफ पटेल यांचा विशेष सत्कार करण्यात आला.यावेळी बालयोगी ह.भ.प. हरिहर महाराज दिवेगावकर यांचे रामजन्म सोहळयानिमीत्ता किर्तन झाले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रा. गौतम बापट यांनी केले. सांगता पसायदानाने झाली.