एकनाथ खडसे यांना न्यायमूर्ती झोटींग समितीचा दणका
पुणे, दि. 30 - पुण्यातील भोसरी येथील एमआयडीसीच्या जमीन खरेदी व्यवहारप्रकरणी न्यायमूर्ती झोटींग समिती कार्यकक्षा ओलांडत असल्याचा दावा करत समितीने दिलेला निर्णय मागे घेण्यात यावा, अशी विनंती करणारा माजी महसूलमंत्री एकनाथ खडसे यांचा अर्ज समितीने फेटाळून लावला आहे. त्यामुळे खडसे यांना जबर फटका बसला आहे.
न्यायमूर्ती झोटींग हे सरकारने निर्धारित केलेल्या कार्यकक्षा ओलांडत असल्याचा दावा एकनाथ खडसे यांनी केला होता. तसेच समितीच्या कार्यकक्षा नव्याने निर्धारित कराव्यात, असे नमूद केले होते. भोसरीतील जमीन व्यवहार प्रकरणात खडसे यांचे हितसंबंध गुंतले असल्याबाबत समितीने चौकशी सुरू केली होती. नेमक्या त्याच मुद्द्यावर खडसे यांनी आक्षेप घेतला होता.
दरम्यान, न्यायमूर्ती झोटींग यांनी त्या अर्जावर निर्णय देत असताना खडसे यांनी उपस्थित केलेल्या मुद्द्यांवर अंतिम अहवालाच्यावेळी विचार करण्यात येईल, असे स्पष्ट केले होते. परंतु, तसे निर्धारित करीत असताना 11 पानी दिलेल्या आदेशात न्यायमूर्ती झोटींग यांनी काही निरीक्षणे नोंदवली होती. त्यात भोसरीतील जमीन व्यवहाराची खडसे यांना संपूर्ण माहिती होती. त्यांच्या पत्नी मंदाकिनी खडसे यांना कथित जमीन नमालक उकाणी यांच्यासोबत केलेला जमीन खरेदी करार आणि त्या करारापोटी दिलेल्या पैशांचीही माहिती होती. त्यामुळेच खडसे यांना महसूलमंत्रीपदाचा राजीनामा दिला होता. त्याशिवाय खडसे यानी समितीसमोर जमीन खरेदी व्यवहार योग्यच असल्याचा दावा केला होता. नंतर खडसे यांना भूमिका बदलली आणि जमीन व्य्वहाराबाबत काहीही माहिती नाही, अशी नवीन भूमिका घेतली असल्याचे त्या निर्णयात नमूद केले होते.