शेतकर्यांच्या सरसकट कर्जमाफीला विरोध : एमआयएम
औरंगाबाद, दि. 09 - शेतकर्यांच्या सरसकट कर्जमाफीला आमचा विरोध आहे. सरसकट कर्जमाफीने धनदांडग्या शेतकर्यांचा फायदा होतो, अशी भूमिका एमआयएमने घेतली आहे. एमआयएमचे आमदार इम्तियाज जलील यांनी औरंगाबादेत पत्रकार परिषदेत माहिती दिली. या भूमिकेमुळेच आम्ही विरोधी पक्षांच्या संघर्षयात्रेत सहभागी झालो नाही, असं जलील यांनी सांगितलं. दरम्यान स्टेट बँक ऑफ इंडियाच्या चेअरमन अरुंधती भट्टाचार्य यांनी कर्जमाफीबाबत केलेल्या वक्तव्याचंही एमआयएमने समर्थन केलं. शेतकरी कर्जमाफी चुकीची असल्याचं मत भट्टाचार्य यांनी व्यक्त केलं होतं.
कर्जमाफीमुळे शेतकर्यांकडून बँकांचे कर्ज फेडण्याच्या जबाबदारीवर चुकीचा परिणाम होतो. कर्जमाफीमुळे शेतकरी पुन्हा निवडणुकीची वाट पाहत राहतील आणि कर्जाची परतफेड करण्याऐवजी कर्ज माफ होण्याची वाट बघतील. सार्वजनिक क्षेत्रातील बँका जेव्हा डबघाईला येतात, तेव्हा त्या सरकारी मदतीची अपेक्षा करतात. मात्र, सार्वजनिक क्षेत्रातील बँकांनीही शेतकर्यांसारखंच सरकारी मदतीची अपेक्षा ठेवू नये आणि आपल्या ताकदीवरच सुधारणा करावी.