Breaking News

‘भारतकेवीर’ या जवानांना मदतीचा हात देणार्‍या सरकारी वेबसाईटला दात्यांचा तुफान प्रतिसाद

मुंबई, दि. 29 - बॉलिवूडचा खिलाडी कुमार अक्षय कुमार याच्या संकल्पनेतून साकार झालेल्या ‘भारतकेवीर’ या जवानांना मदतीचा हात देणार्‍या सरकारी वेबसाईटला दात्यांचा तुफान प्रतिसाद लाभला आहे. सुकमा हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांच्या कुटुंबीयांच्या मदतीसाठी देणार्‍यांचे हजारो हात सरसावले आहेत.
लहरीरींज्ञर्शींशशी.र्सेीं.ळप (भारतकेवीर.जीओव्ही.इन) ही वेबसाईट 9 एप्रिलला अक्षय कुमार आणि गृहमंत्री राजनाथ सिंह यांच्या उपस्थितीत लाँच करण्यात आली होती. निम्नसैनिक दलातील कोणत्याही शहीद जवानाच्या कुटुंबीयांना या वेबसाईटच्या माध्यमातून थेट मदत (15 लाख रुपयांपर्यंत) करता येते. शुक्रवारी या वेबसाईटवर दिलेल्या माहितीनुसार छत्तीसगडच्या सुकमातील नक्षली हल्ल्यात शहीद झालेल्या 25 सीआरपीएफ जवानांच्या कुटुंबीयांना 12 तासांच्या आत भरभरुन मदत करण्यात आली आहे.