Breaking News

पोहायला गेलेल्या युवकाचा बडून मृत्यू

सातारा, दि. 17 (प्रतिनिधी) : कोयना नदीत मित्रांसोबत पोहायला गेलेल्या विशाल बबन सूर्यवंशी (वय 23, रा. कराटे, ता. पाटण) या युवकाचा बुडून मृत्यू झाल्याची घटना पाटण तालुक्यातील गुंजाळी गावच्या हद्दीत घडली. सायंकाळी पाच वाजता विशाल हा दोन मित्रांसोबत कोयना नदीत पोहायला गेला. पोहताना तो बुडायला लागल्याने मित्रांनी त्याला वाचविण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांना यश आले नाही. रात्र झाल्याने नातेवाईकांनी शोधमोहीम थांबविली. सकाळी शोधकार्य सुरु केले त्यावेळी त्याच ठिकाणी विशालचा मृतदेह सापडला. या घटनेची फिर्याद अंकुश मारूती सुर्यवंशी यांनी दिली आहे.