Breaking News

श्री सिद्धीविनायक हॉस्पीटल मातृआशिर्वादाने जनसेवेत रुजू

शहरातील नामांकित डॉक्टरांसह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी दिल्या शुभेच्छा!

बुलडाणा, दि. 17 - घर सुटतं पण, आठवण कधीच सुटत नाही जीवनात आई नावाचं पान कधीच मिटत नाही. सारा जन्म चालून पाय जेव्हा थकून जातात, शेवटच्या श्‍वासाबरोबर आई हेच शब्द राहतात. स्वामी तिन्ही जगांचा आईविना भिकारी. आ म्हणजे आत्मा ई-म्हणजे ईश्‍वर आत्मा व परमात्मा यांचे एकरुप ती आई असते. ज्या माणसाकडे आई असते, तो माणूस सर्वात श्रीमंत समजला जातो. असाच एक सुवर्ण योग घडवून आणला तो डॉ.विजय निकाळे, डॉ.सोनाली निकाळे व डॉ.सुनील राजपूत यांनी संपूर्ण जगाला दाखवून दिलंय की, आपल्या माता पित्यांशिवाय कुणीही मोठा नेता नाही. म्हणून आपल्या वैद्यकीय व्यवसायाची सुरुवात शनिवारी दि.15 एप्रिल पासून डॉ.राजपूत यांच्या आई श्रीमती पुष्पा राजपूत तसेच डॉ.निकाळे यांच्या मातोश्री अनुसया निकाळे यांच्या शुभ हस्ते फित कापून मोठ्या थाटात श्री सिद्धीविनायक हॉस्पीटल सर्जिकल ट्रामा व क्रिटीकल केयर सेंटरचा शुभरंभ करण्यात आला. यावेळी माजी आमदार दिलीपकुमार सानंदा, विजयराज शिंदे, महिला व बालकल्याण सभापती श्‍वेताताई महाले, जि.प.सदस्य जयश्रीताई शेळके, धनगर समाज संघर्ष समितीच्या रजनीताई बोरसे, डॉ.गणेश गायकवाड, डॉ.रामदास भोंडे, डॉ.मेहेत्रे, डॉ.गजानन व्यवहारे, डॉ.प्रतिमा व्यवहारे, डॉ.उकार्डे, डॉ.छाजेड, डॉ.दिपक काटकर, डॉ.निखील खरात, नानासाहेब देशमुख, शंकरशेठ चौधरी, शिवसेना जिल्हाप्रमुख जालिंधर बुधवत, गुरु रविदास समता परिषदेचे राज्य उपाध्यक्ष के.एम.वैरी, इंजि.शिवाजी जोहरे,पत्रकार गणेश सोनुने, पुरुषोत्तम बोर्डे, गणेश भोलाने, दिपक भोलाने व विविध क्षेत्रातील नामांकित मान्यवरांसह सागवन, साखळी, कोलवड, देऊळघाट, सव इत्यादी गावांतील असंख्य नागरिक उपस्थित होते. डॉ. सुनिल राजपूत यांनी एमबीबीएस एमडी मेडिसीन पुणे येथे शिक्षण घेवून मुंबई येथील बॉम्बे हॉस्पीटलला अतिदक्षता विभागात काम करण्याचा प्रचंड अनुभव मिळविला आहे. तर डॉ.विजय निकाळे हे एमबीबीएस एमएस सर्जरी आहेत. यांनी जगप्रसिद्ध ग्रँट शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जेजे रुग्णालय येथून सर्जरी ही पदवी उत्तीर्ण करुन पुणे येथील शासकीय महाविद्यालय व ससून रुग्णालय येथे असिस्टंट प्रोफेसर म्हणून विद्या दानाचे काम केले आहे. तर दुर्बिनीद्वारे करण्यात येणार्‍या शस्त्रक्रिया करण्याचा प्रचंड अनुभव मिळवून मुंबई येथे ट्रामा विभागात काम करण्याचा विशेष अनुभव मिळविला. तर कॅन्सर व जळीत रुग्णांच्या उपचारात विशेष रुची निर्माण केली आहे. डॉ.सोनाली निकाळे बीएएमस क्षारसूत्र आहेत. त्यांनी मुंबई येथील प्रसिद्ध पोद्दार शासकीय आयुर्वेद महाविद्यालय, येथून आयुर्वेदाचार्य ही पदवी प्राप्त करुन क्षारसूत्र पद्धतीने मुळव्याध व तत्सम उपचारात विशेष प्राविण्य मिळविले आहे. त्यामुळे या ठिकाणी तज्ज्ञ डॉक्टरांची टीम 24 तास उपलब्ध राहणार आहे. अतिदक्षता विभाग, मेडिकल, लेबॉरेटरी, एक्सरे, वातानुकूलीत स्वतंत्र रुम, कमी खर्चात अत्याधुनिकस सेवा, प्रशिक्षित नर्सिंग स्टाफ उपलब्ध राहणार आहे. सर्व प्रकारच्या सर्जरी व शेकडो आजारांवर उपचार केल्या जाणार आहेत. तर ग्रामीण भागातून येणार्‍या रुग्णांना अल्पदरात यथायोग्य सेवा देणार असून आरोग्य सेवा हिच ईश्‍वर सेवा मानून रुग्णांची शक्य होईल तेवढी सेवा येथे दिल्या जाईल, अशी ग्वाही डॉ.सुनिल राजपूत, डॉ.विजय निकाळे व डॉ.सोनाली निकाळे यांनी रुग्णालयाच्या शुभारंभाप्रसंगी दिली.