Breaking News

भीमकन्या पुरस्काराने सामाजिक एकापो वाढेल - आ. अरुण जगताप

अहमदनगर, दि. 17 - भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती यांच्या 126व्या जयंतीनिमित्त शहरात राष्ट्रवादी काँग्रेस सामाजिक न्याय विभागाच्या वतीने भीम महोत्सव सुरू करण्यात आले आहे. या महोत्सवामध्ये 5 दिवस शहरात भरगच्च कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत.
भीमकन्या पुरस्काराने या महोत्सवाची सुरुवात सहकार सभागृह येथे झाली. शहरात विविध क्षेत्रात  नेत्रदीपक कामगिरी करणार्‍या व्यक्तींच्या आईंच्या यावेळी सन्मान करण्यात आला. शहरातील 11 महिलांचा भीम कन्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले
या पुरस्कार वितरण सोहळ्याप्रसंगी बोलताना आ. अरुण जगताप म्हणाले की, विविध समाजातील महिलांना सन्मानित करण्याच्या या अनोख्या प्रयत्नामुळे शहरातील सामाजिक ऐक्य वाढीस मदत होईल. जातीयतेचा अंत अशा कार्यक्रमाद्वारे होतो, असे ते म्हणाले.
जिल्हाधिकारी अनिल कवडे म्हणाले की, सुरेश बनसोडे आणि त्यांच्या टीमचे कार्य निश्‍चितच कौतुकास्पद आहे. अशा कार्यक्रमांना प्रोत्साहन देण्यासाठी जिल्हा प्रशासन नेहमीच अग्रेसर राहील. आमदार संग्राम जगताप यांनी देखील आयोजकांचे भरभरून कौतुक केले आणि सामाजिक न्याय विभागाच्या पाठीशी सदैव उभे राहू, असे सांगितले.
आयोजक सुरेश बनसोडे म्हणाले की, जिल्ह्यातील सामाजिक वातावरण दूषिक करण्याचा प्रयत्न काही जातीयवादी शक्तींनी केली. परंतु आम्ही तसे होऊ दिले नाही. समाजासमाजामध्ये निर्माण झालेली दरी दूर करण्याचा प्रयत्न आम्ही  करीत आहोत, असे ते म्हणाले.भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त राष्ट्रवादी सामाजिक न्याय विभागाच्या वतीने कर्तृत्ववान महिलांना जिल्हाधिकारी अनिल कवडे, आ. अरुण जगताप व आ. संग्राम जगताप यांच्या हस्ते भीमकन्या पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. यावेळी शहर जिल्हाध्यक्ष सुरेश बनसोडे, प्रा. माणिक विधाते, अभिजीत खोसे, ज्ञानदेव पांडुळे, इंजि. परिमल निकम, जालिंदर बोरुडे, संध्या मेढे, संभाजी पवार, नीलेश बांगरे, साधना बोरुडे उपस्थित होते.सुरुवातीला शिवव्याख्याते अफसर शेख यांचे व्याख्यान झाले. मान्यवरांनी आपल्या भाषणात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवन चरित्रावर प्रकाश टाकला. या सोहळ्यात पार्वती अरुण जगताप, इंदुमती जगन्नाथ निकम, श्रीमती संपत्तीबाई रामदास शिंदे, मदिना यासीन शेख,  श्रीमती बबईबाई केरुजी बोरुडे, ताराबाई हरिश्‍चंद्र खामकर, कमलबाई कमकमल गुगळे, सुशीलाताई सुदाम शिरसाठ, रंजना भीमराव जाधव, शोभा कुलकर्णी, प्रमिला पवार आदींना भीमकन्या पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. सूत्रसंचालन उद्धव काळापहाड यांनी केले. अंकुश मोहिते यांनी आभार मानले.