Breaking News

महात्मा ज्योतिबा फुले जयंतीनिमित्त गायींना चार्‍याचे वाटप कार्यक्रम संपन्न

अहमदनगर, दि. 17 - नगर तालुक्यातील नागरदेवळे परिसरात महात्मा ज्योतिबा फुले युवा मंचच्या वतीने श्री हनुमान जयंती व थोर समाजसुधारक महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती सामाजिक उपक्रमांनी उत्साहात साजरी करण्यात आला. यानिमित्त नागरदेवळे येथील माऊली गोशाळेतील गायींना चारा देण्यात आला.
यावेळी सरपंच राम पानमळकर, विकास दरवडे, आदिनाथ शेलार, बाबा गिते, गणेश धाडगे, आयूब पठाण, गोकुळ धाडगे, शिवाजी खरपुडे, दादा ताजणे, कैलास शिंदे, प्रकाश शिंदे, मोहिनीराज कुर्‍हे, महेश झोडगे, पोपट धाडगे, राहुल शिंदे, समृद्धी धाडगे, मोहन धाडगे, भांबळ, भिंगारदिवे, दत्ता काटकर आदी उपस्थित होते.
यावेळी आदिनाथ शेलार म्हणाले की, नागरदेवळे परिसरात यंदाही श्री हनुमान जयंती, तसेच महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती साजरी करण्यात आली. यानिमित्त सामाजिक भावनेतून समाजोपयोगी उपक्रम राबविण्यात आले. गायींना हिंदू धर्मात देवतेचे स्थान असून, गायींना चारा देण्याचे पुण्यकर्म आम्ही आज कमावले आहे. महात्मा ज्योतिबा फुले यांच्या विचारांनी आम्ही प्रेरित असून, त्यांच्या शिकवणुकीप्रमाणे कार्य करीत आहोत, असे ते म्हणाले.