महेन्द्र खांडेकर यांच्यावर शासकीय इतमामात अंतिम संस्कार
बुलडाणा, दि. 21 - तालुक्यातील शेलु येथील सैनिक महेन्द्र आकाराम खांडेकर यांच्या वर शासकीय इतमामात अंतिम संस्कार करण्यात आले. रांची छत्तीसगड येथे आठ महार रेजिमेंट मध्ये ते सुभेदार पदावर कार्यरत होते. नियमित सरावा दरम्यान त्यांना ह्रदय विकाराच्या धक्का बसला. त्यात त्यांचे निधन झाले. त्यांचे पार्थिव दर्यापूर व शेलु नजीक येथील निवासस्थानी अंतिम दर्शनासाठी काही वेळ ठेवून गावाशेजारी त्यांच्या शेतात पोलीस व सैन्यदलाच्या वतीने बंदुकी च्या तीन फैरी झाडुन त्यांचा मुलगा वैभव याने चिताग्नी दिली.
यावेळी आमदार हरिष पिंपळे, जिल्हाधिकारी जी.श्रीकांत, उपविभागीय अधिकारी भागवत सैंदाने, तहसिलदार राहुल तायडे, उपविभागीय पोलीस अधिकारी कल्पना भराड, नायब तहसिलदार वैभव फरताडे, डाबेराव, पोलीस निरीक्षक नितीन पाटील, डॉ.अमित कावरे, रावसाहेब कांबे, अमरावती जिल्हा परिषद शिक्षण सभापती बळवंत वानखडे मोहन गावंडे पाटिल भाऊसाहेब खांडेकर भाजपा चे तालूका अध्यक्ष नारायणराव भटकर संदीप जळमकर गजानन नाकट, छत्रपती साबळे, राजकुमार नाचणो यांचेसह असंख्य नागरीक उपस्थित होते.