शॉर्टसर्किटमुळे घराला आग
सुदैवाने जिवीत हानी टळली; आगीत 17 लाखांचे साहित्य खाक
बुलडाणा, दि. 21 - शहरातील विष्णूवाडी येथील बाळकृष्ण नारखेडे यांच्या घराला मध्यरात्री 2 वाजेच्या सुमारास शॉर्टसर्किटमुळे अचानक आग लागुन 17 लाखांचे नुकसान झाले आहे. या घटनेत जवीत हानी झाली नाही. रात्री किचनमध्ये आगीचे लोळ उठत असल्याने वरच्या मजल्यावर गाढ झोपेत असलेल्या कुटूंबीयांची एकच तारांबळ उडाली. बाळु नारखेडे यांनी आरडाओरड केल्याने शेजरी झोपेतून उठले व काहींनी आग विझविण्याचा प्रयत्न केला. तर अग्नी शामक दलाचे वाहन घटनास्थळी पोहचल्याने आग आटोक्यात सुदैवाने जिवीत हानी झाली नसली तरी नारखेडे यांच्या घरातील जवळपास महत्वाचे सर्व सामान जळुन खाक झाले आहे.विष्णूवाडी स्थित बाळकृष्ण नारखेडे यांचे घर आहे. रात्रीचे जेवण आटोपून नारखेडे कुटूंबीय वरच्या मजल्यावर झोपी गेले. मध्यरात्री 2 वाजून 45 वाजता नारखेडे यांच्या पत्नी मनीषा यांना अचानक जाग आली. तसेच घरामध्ये धुर साचल्याचे त्यांना दिसुन आले. त्यानंतर त्या उठुन पाहिले असता किचनमध्ये आगीचे लोळ उटत होते. याची माहिती त्यांनी मोबाईलवरुन आपले पती बाळकृष्ण नारखेडे यांना दिली. तसेच आरडाओरड करुन शेजार्यांना उठवण्याचा प्रयत्न केला. वरच्या मजल्यावर झोपलेले बाळु नारखेडे मागच्या दरवाज्याने प्रवेश केला. व सर्व कुटूंबीयांना बाहेर काढले. या घटनेची माहिती शेजार्यांनी शहर पोलिस स्टेशन तसेच अग्नीशमक दलाला दिली. या घटनेची माहिती मिळताच शहर पोलिस व अग्नीशमक दलाचे वाहन घटनास्थळी दाखल झाले. तोपर्यंत शेजार्यांनी बोअर व नळ चालु करुन आग विझविण्याचा आटोकाट प्रयत्न केला. परंतु तोपर्यंत घरातील टिव्ही, फ्रिज, पंखे, एसी, डीव्हीडी प्लेयर, फर्नीचर जळुन खाक झाले होते. किचनमधील सिलेंडर बाजुला असल्याने ते वाचले अन्यथा मोठी दुर्घटना घडली असती. या घटनेची माहिती शहरार पसरल्याने शिवसेना नेते संजय गायकवाड, बद्रीसेठ पंजाबी, डॉ. काळे, शिक्षक इंगळे, पिंपरकर, लढ्ढा, जाधव यांनी मदतीसाठी प्रयत्न केले. व नारखेडे कुटूंबीयांना दिलासा दिला. या आगीत जवळपास 17 लाखाचे नुकसान झाल्याचा कुटूंबीयांचा अंदाज आहे.