Breaking News

मालेगाव महापालिका निवडणूक, एमआयएमच्या प्रचाराचा शुभारंभ

मालेगाव, दि. 29 - मालेगाव महापालिकेच्या रणधुमाळीला सुरूवात होण्याआधीच एमआयएमनं असदद्दुदीन यांची सभा घेऊन प्रचाराचा शुभारंभ केला.  मालेगावमध्ये खासदार ओवेसींची सभा झाली. यावेळी ओवेसींनी पक्षानं हैदराबादमध्ये केलेल्या कामाची माहिती सांगत एमआयएमच्या उमेदवारालाच निवडून देण्याचं आवाहन केलं.  यावेळी त्यांनी संघ आणि भाजपवर जोरदार टीका केली. आयसिसचा अतिरेकी मारला गेला तर मोदी ट्टविट करतात पण गोरक्षकांनी 9 लोकांना मारलं त्यबद्दल ट्विट का करत नाहीत असा खोचक सवालही ओवेसींनी उपस्थित केला.