Breaking News

राज्यात तूर खरेदीत मोठा घोटाळा - खा. राजू शेट्टी

कोल्हापूर, दि. 25 - राज्यात तूर खरेदीत मोठा घोटाळा झाल्याचा आरोप खा. राजू शेट्टी यांनी केला आहे. तूर खरेदी बंद म्हणजे शेतकर्‍यांना वार्‍यावर सोडण्याचा प्रकार असून प्रसंगी तूर खरेदीसाठी रस्त्यावर उतरू, असा इशारा खा. शेट्टी यांनी दिला आहे.
व्यापारी आणि नाफेडच्या संगनमताने शेतक-यांची फसवणूक सुरू असून संबंधित अधिका-यांची चौकशी करा, अशी मागणी शेट्टी यांनी केला. शेतक-याची तूर सरकारला खरेदी करावीच लागेल. शेतकर्‍यांनी कवडीमोल भावात तूर विकू नये. शेतकर्‍यांसाठी कुणी संघर्ष केला तर त्याचे स्वागतच केले जाईल. सातबारा कोरा केल्याशिवाय शांत बसणार नाही, असेही शेट्टी म्हणाले.