शेतकरी संघटनेची सीएम टू पीएम आसूड यात्रा
लातूर, दि. 09 - शेतकर्यांचे संपूर्ण कर्ज माफ करवे आणि वीज बिलातून मुक्ती मिळावी, स्वामीनाथन समितीच्या शिफारसी लागू कराव्यात, शेतमालाला उत्पादन खर्च आधिक 50 टक्के नफा धरुन भाव मिळावा, शेतमालावरील निर्यातबंदी थांबवावी यासाठी 11 एप्रिल महात्मा फुले जयंती दिनी सीएम टू पीएम अशी आसूड यात्रा निघणार आहे.
मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानापासून शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रघुनाथदादा पाटील व प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखाली ही यात्रा निघणार आहे. नागपूर, यवतमाळ, सेवाग्राम, नांदेड, परभणी, बीडमार्गे 13 एप्रिल रोजी लातुरात यात्रेचे आगमन होणार आहे. औसा तालुक्यातील बुधोडा येथे सभेचे आयोजन केले जाणार आहे. पुढे तुळजापूर मार्गे पश्चिम महाराष्ट्र आणि खानदेशातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे गाव वडनगर (गुजरात) येथे 21 एप्रिल रोजी पोचणार आहे. या यात्रेत मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन शेतकरी संघटनेचे राजकुमार सस्तापुरे, रुपेश शंके, विमलताई आकनगिरे, अनंत दोडके, बालाजी महाके, बाबासाहेब दिवे, साहेबराव पवार, अंगद भंडे, पांडुरंग पाटील, शिवाजी गोडबोले यांनी केले आहे.