चैतन्य आयुर्वेद महाविद्यालय मालमत्ता तोडफोड प्रकरणी एकनाथ खडसेंना जामीन
जळगाव, दि. 25 - चैतन्य आयुर्वेद महाविद्यालयाच्या देवेंद्र इमारतीत अनधिकृत प्रवेश करत संस्थेच्या रेकॉर्ड व कपाटांची तोडफोड केल्याप्रकरणी दाखल गुन्ह्याच्या खटल्यातील संशयीत आरोपी माजी महसूल मंत्री आमदार एकनाथ खडसे यांना आज न्यायालयाने जामीन मंजूर केला. चैतन्य आयुर्वेद महाविद्यालयाच्या देवेंद्र इमारतीत संस्थेर्डसह कपाटाची तोडफोड केल्याप्रकरणी माजी मंत्री एकनाथराव खडसे यांच्यासह 18 जणांविरूद्ध नितीन गोविंदा भोळे यांच्या फिर्यादीनुसार 20 एप्रिल 2008 रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता. या खटल्यात 18 जून 2016 रोजी आमदार खडसेंविरूद्ध जामीनपात्र वॉरंटचा हुकूम बजावण्यात आला होता,त्यानुसार ते खडसे आज भुसावळच्या अतिरिक्त सत्र न्यायालयातील न्या़. एम.एम़बवरे यांच्या न्यायासनासमोर हजर झाले़ वॉरंट रद्द करण्यासह जामिनासाठी अर्ज करण्यात आला तो न्यायालयाने मंजूर केला़ 15 हजार रुपयांचा जामीन मंजूर करण्यात आला़