वादग्रस्त ट्वीटप्रकरणी प्रशांत भूषण यांच्या विरोधात गुन्हा दाखल
नवी दिल्ली, दि. 03 - सुप्रीम कोर्टचे प्रसिद्ध वकील आणि आम आदमी पक्षाचे माजी नेते यांच्या वादग्रस्त ट्वीटमुळे त्यांची चांगलीच गोची झाली आहे. त्याच्याविरोधात आता लखनऊमध्ये गुन्हा दाखल झाला आहे. उत्तर प्रदेश काँग्रेस कमेटीचे प्रवक्ते जीशान हैदर यांनी भूषण यांच्या ट्वीटवर आक्षेप घेत, हजरतगंज कोतवाली पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली आहे. तसेच प्रशांत भूषण यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे.
प्रशांत भूषण यांनी रविवारी श्रीकृष्णाची तुलना रोमिओसोबत केली. यानंतर त्यांच्यावर चहूबाजूने टीका होत होती. प्रशांत भूषण यांच्या या वादग्रस्त ट्वीटनंतर उत्तर प्रदेशमधील विश्वभद्र पुजारी पुरोहित महासंघाच्या पुजार्यांनी रस्त्यावर उतरुन निषेध व्यक्त केला. तसेच त्यांच्याविरोधात यावेळी घोषणाबाजी ही करण्यात आली.