काहीही करा, पण तूर खरेदी करा, शेतकर्याची सरकारला आर्त हाक
हिंगोली/उस्मानाबाद, दि. 24 - तूर विक्रीसाठी गेल्या आठ दिवसांपासून रणरणत्या उन्हात तूर खरेदी केंद्रांबाहेर उभे आहोत. व्यापारी कवडीमोल भावाने तूर घेतायेत, काहीही करा, पण आमची तूर खरेदी करा, अशी आर्त हाक शेतकर्यांनी सरकारला दिली आहे. शेतकर्यांनी सर्व तहान-भूक विसरुन 45 डिग्रीच्या रणरणत्या उन्हात सरकारी तूर खरेदी केंद्राबाहेर गर्दी केली आहे. मराठवाडा आणि विदर्भातल्या बहुतांश जिल्ह्यात तूर खरेदी केंद्रांबाहेर पाच ते सात किमीच्या ट्रॉलीच्या रांगा लागलेल्या दिसत आहेत.
महाराष्ट्रात जवळपास 316 तूर खरेदी केंद्र आहेत. सद्यस्थितीत प्रत्येक केंद्राबाहेर अंदाजे 20 हजार क्विंटल तूर विक्रीसाठी शेतकर्यांनी आणलेली आहे. अजूनही तुरीची आवक सुरुच आहे. त्यामुळे लवकरात लवकर तूर खरेदी सुरु करावी, असे पत्र राज्यातील बाजार समित्यांनी सरकारला पाठवले आहेत. व्यापार्यांकडून तूर तीन ते साडे तीन हजार रुपये प्रति क्विंटलने खरेदी केली जाते. सरकारी तूर केंद्रांवर शेतकर्यांकडून तुरीला 5 हजार रुपये प्रति क्विंटल भाव दिला जात आहे. मात्र सरकारने तूर खरेदी करण्यासाठी ठेवलेली मुदत 22 एप्रिल रोजी संपली. मात्र त्यानंतरही तुरीची आवक सुरुच आहे. बाजार समित्यांमध्ये शेतकर्यांनी रांगा लावल्या आहेत. आज ना उद्या तूर खरेदीचा निर्णय होईल, या आशेने शेतकरी एवढ्या उन्हात रांगेत बसून आहे. बाजारात आणलेली तूर पुन्हा घराकडे नेऊन, निर्णय झाल्यानंतर बाजारात आणणं शेतकर्यांना परवडणारं नाही, त्यामुळे तूर खरेदीचा निर्णय होईपर्यंत वाट पाहण्याशिवाय शेतकर्यांकडे पर्याय नाही. त्यामुळे शेवटच्या दाण्यापर्यंत तूर खरेदी करु, असं आश्वासन देणारं सरकार आपला शब्द पाळतं का, ते पाहणं महत्वाचं ठरणार आहे.