Breaking News

पिंपरी महापालिकेच्या घरकुल घोटाळ्यातील पाच जणांना अटक

पुणे, दि. 24 - बनावट कागदपत्रे सादर करून घरकुल लाटल्याप्रकरणी पिंपरी पोलिसांनी पाच जणांना अटक केली आहे. पिंपरी महापालिकेच्या जवाहर नेहरू घरकुल योजनेमध्ये बनावट कागदपत्र सादर करून गोरगरीबांसाठी असलेली घरे अटक करण्यात आलेल्या आरोपींनी लाटली होती. अटक करण्यात आलेल्या आरोपींना सोमवार (दि.24) पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
शिवपुत्र शरणाप्पा नाटेकर (वय-45), सलीम मोहमद हुसेन बागवान (वय -46), इजहारअली शेख (वय-42), उत्तम गिरमा मंडलीक (वय-40), नजमुनिसा रशीद खान (वय-55, सर्व रा. ओटास्कीम, निगडी), अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी पालिकेचे तत्कालीन सहाय्यक आयुक्त सुभाष सावन माछरे (वय-58, रा. थेरगाव) यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिंपरी महानगरपालिकेच्या वतीने शहरातील गोरगरीब लोकांसाठी स्वस्त घर घरकुल योजना राबवण्यात आली होती. सेक्टर नंबर 22 मध्ये ही योजना राबवण्यात आली होती. अटक करण्यात आलेल्या आरोपींनी बनावट कागदपत्र सादर करून घरकुल मिळवले होते. दरम्यान, काही लाभार्थ्यांनी बनावट कागदपत्र सादर करून घरकुल घेतले असल्याचे समोर आले. माछरे यांनी खातरजमा करून बनावट कागदपत्र सादर करून घरकुल लाटणा-यांविरुद्ध फिर्याद दिली होती. बनावट कागदपत्र सादर करून घरकुल लाटल्यापैकी पिंपरी पोलिसांनी पाच जणांना अटक केली आहे.
पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.