Breaking News

औरंगाबादच्या ऑरिक सिटी प्रकल्पाकडे मोठ्या कंपन्यांची पाठ

औरंगाबाद, दि. 30 - औरंगाबाद शहरातील ऑरिक सिटी प्रकल्पाकडे 8 मोठ्या प्रकल्पांनी पाठ फिरवली आहे. त्यात प्रसिद्ध मोटर कंपनी ह्युंदाईनं मराठवाड्यातील प्रस्तावित गुंतवणूक महाराष्ट्राऐवजी आंध्रप्रदेशात हलवण्याचा निर्णय घेतला आहे. मराठवाड्याच्या औद्योगिक विकासात मैलाचा दगड बनू पाहणार्‍या दिल्ली मुंबई इंडस्ट्रिअल कॉरिडॉरचा ऑरिक सिटी प्रकल्प औरंगाबादमध्ये होऊ घातला होता. मात्र ह्युंदाईच्या या निर्णयामुळे त्याला पूरक उद्योग येण्याचीही शक्यता कमी झाली आहे. ऑरिक सिटी हा देशातील सर्वात आधुनिक प्रकल्प असून या प्रकल्पामुळे 30 लाख लोकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे, मात्र मोठ्या कंपन्यांनी प्रकल्पाकडे पाठ फिरवल्यानं प्रकल्पावरच प्रश्‍नचिन्ह निर्माण झालं आहे.
दिल्ली मुंबई इंडस्ट्रिअल कॉरिडॉरचा ऑरिक सिटी प्रकल्पामध्ये इंग्लंडमधील देलारू, प्रिमिअम ट्रान्समिशन, नेस्लेसह अनेक  उद्योग आणि किया मोटर्सशी आपले उद्योग उभारणार  आणि 3 लाख प्रत्यक्ष रोजगार निर्माण होणार अशी मुख्यमंत्र्यांनी घोषणा केली. मात्र ह्युंडाई मोटार्सच्या या निर्णयामुळे दिल्ली-मुंबई इंडस्ट्रीयल कॉरिडॉरमधील पहिल्याच मोठ्या गुंतवणुकीला धक्का बसला आहे. मराठवाड्यातील मोठ्या उलाढालीला यानिमित्ताने ब्रेक लागला आहे.
औरंगाबाद शहरात बजाज कंपनीनं गुंतवणूक केली आणि औरंगाबादच्या विकासाची गती अनेक पटीनं वाढली. औरंगाबादेत ह्युंडाई कंपनी आली असती औरंगाबादच्या विकासाबरोबरच  15 हजार कुशल कामगारांना रोजगार मिळाला असता. मात्र या कंपनीला सरकारी दरबारी योग्य प्रतिसाद न मिळाल्यानं औरंगाबादच्या विकास जो पर्यंत एखादी मोठी कंपनी येत नाही तो पर्यंत होणार नाही.