पीएमपीएमएलच्या वाहतूक व्यवस्थापकाची थेट तृतीय श्रेणीत पदावनती
पुणे, दि. 24 - अनंत वाघमारे यांची बेकायदेशीरपदोन्नती केली तुकाराम मुंढे यांनी रद्द
पीएमपीएमएलच्या प्रथम श्रेणीच्या वाहतूक व्यवस्थापकपदी असलेले अनंत वाघमारे यांची पदोन्नती बेकायदेशीर असल्याचे उघकीस आल्यानंतर अध्यक्ष तुकाराम मुंढे यांनी त्यांची रवानगी थेट तृतीय श्रेणीच्या पदावर केली आहे. त्यांना आता भांडार विभागाचे प्रमुख पंकज गिरी यांच्या नियंत्रणाखाली काम करण्याचे आदेश दिले आहेत.
अनंत वाघमारे पीएमपीएमएलमध्ये 22 वर्षांपूर्वी गुणवत्ता नियंत्रकया तृतीय श्रेणीच्या पदावर नियुक्त झाले होते. ते सध्या प्रथम श्रेणीचे वाहतूक व्यवस्थापक आणि सरव्यवस्थापक ही पदे सांभाळत होते, परंतु तृतीय श्रेणीच्या पदावरून त्यांची सिनीअर वर्क्स मॅनेजर, मुख्य अभियंता आणि संचलन वाहतूक व्यवस्थापकपदी बेकायदेशीर पदोन्नती झाल्याचे आढळल्याने तुकाराम मुंढे यांनी त्यांना पदावरून हटवल्याची चर्चा सध्या कामगार वर्गात सुरू आहे.
सध्या वाघमारे यांच्या पदाचा कार्यभारसुनील गवळी यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. यापूर्वी गवळी हे वाहतूक व्यवस्थापकपदी नियुक्त होते. त्यांच्याकडे आता वाहतूक विभागाचे संचालन आणि व्यावसायिक या दोन्ही विभागांची जबाबदारी दिली आहे.