परराज्यातील काश्मिरी विद्यार्थ्यांना सुरक्षा पुरवा - पंतप्रधान मोदी
नवी दिल्ली, दि. 24 - अन्य राज्यांत असलेल्या काश्मिरी विद्यार्थ्यांपर्यंत त्या त्या राज्य सरकारांनी पोहोचावे, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना केले. निती आयोगाच्या परिषदेत जम्मू-काश्मीरच्या मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांनी या संदर्भातील मुद्दा उपस्थित केल्यानंतर पंतप्रधानांनी या सूचना दिल्या. मेवाड (राजस्थान)मधून काही काश्मिरी विद्यार्थ्यांना विरोध झाल्यानंतर मेरठमध्ये उत्तर प्रदेश सोडा, असे फलक लागले. त्या पार्श्वभूमीवर काश्मिरी विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न उपस्थित झाला. काश्मिरी विद्यार्थी अन्य राज्यांत शिकत आहेत. त्यामुळे त्या त्या राज्य सरकारांनी त्या विद्यार्थ्यांकडे लक्ष द्यावे, असे आवाहन मेहबूबा मुफ्ती यांनी केले. त्यानंतर पंतप्रधानांनी सर्व राज्यांना उपरोक्त सूचना दिल्या.
