Breaking News

ईव्हीएम यंत्रांत बिघाड; काँग्रेस व आपच्या नेत्यांचे एकमत

नवी दिल्ली, दि. 24 - दिल्ली महापालिकांसाठी आज झालेल्या मतदानादरम्यान अनेक केंद्रांवर इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रे काम करत नसल्याची तक्रार काँग्रेस व आम आदमी पक्षाच्या नेत्यांनी केली. आधीपासूनच आम आदमी पक्ष व काँग्रेस मतदान यंत्रातील फेरफाराबाबत तक्रार करत होते. आता आज याच मुद्यावर दोन्ही पक्षांचे एकमत असल्याचे दिसून आले.आम आदमी पक्षाने आधीच ईव्हीएम यंत्रे सदोष असल्याचे म्हटले होते. त्या पार्श्‍वभूमीवर आज महाराष्ट्र काँग्रेसचे नेते शेहजाद पूनावाला यांनीही यंत्रे सदोष असल्याचे सांगत ‘आप’ला समर्थन दिले. त्यावर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी पुन्हा ट्विट करून अत्यंत असुरक्षित यंत्रे असल्याचे म्हटले आहे.