Breaking News

शेतकर्‍यांच्या कर्जमाफीसाठी चिखलीत निषेध रॅली

बुलडाणा, दि. 17 - शेतकरी कर्जमाफीसाठी कॉगे्रस, राष्ट्रवादी कॉगे्रस, शेकाप, समाजवादी पार्टी, पिपल्स रिपब्लिकन पार्टी यांचेसह घटक पक्षाने सिंदखेड राजा येथून काढलेली दुसर्‍या टप्यातील संघर्ष यात्रा व या यात्रेत सहभागी अनेक मान्यवर नेत्यांसह 15 एप्रिल रोजी दुपारी 2 वाजता चिखली येथे पोहचली. चिखली जालना रोडवरील शासकीय विश्राम गृहाजवळ या यात्रेचे कॉगे्रस पक्षाच्या हजारो कार्यकत्यांनी स्वागत केले. व तेथून या संघर्ष यात्रेत सहभागी होत हजारो मोटारसायकल, अ‍ॅटोसह निषेध रॅली विश्राम गृह ते खामगांव चौफुली तेथून शिवाजी पुतळा, जयस्तंभ चौक जुनेगांव मार्गे पॉवर हाउस पर्यंत जावून ही संपुर्ण रॅली बुलडाण्याकडे संघर्ष यात्रेच्या होणार्‍या सभेसाठी रवाना झाली. या निषेध रॅलीत  सहभागी सर्व विविध पक्षाच्या घटक नेत्यांनी आमदार राहुलभाउ बोंद्रे यांनी काढलेल्या या निषेध रॅलीत टॅक्टरवर बसून सहभाग घेतला. टॅक्टरवर बसलेले नेते त्यांच्या मागे हजारो मोटरसायकल स्वार कार्यकर्ते अ‍ॅटो व या ताफयात शेकडो चारचाकी वाहने यामुूळे चिखलीतील प्रमुख मार्ग गजबजून यात्रामय माहोल निर्माण झाल्याचे दिसून आले.
भाजप, शिवसेना सरकारला शेतकरी आत्महत्या रोखण्यास आलेले अपयश, शेतकरी कर्जमाफीसाठी केली जाणारी दिरंगाई, शेतीमालाचे कोसळलेले भाव, शासकीय खरेदी बाबत सकारची अनास्था आदी प्रश्‍नाबाबत निषेध करण्यासाठी शेतकर्‍यांचा सात बारा कोरा करा या प्रमुख मागणीला घेवून मॉ जिजाउ जन्मभ्ाुमीच्या पवित्र शहरातून सकाळी राष्ट्रवादीचे नेते आ.अजिदादा पवार, विरोधी पक्षनेता राधाकृष्ण विखे पाटील, उपसभापती विधान परिषद  माणिकराव ठाकरे, पिरीपाचे अध्यक्ष जोगेद्र कवाडे, विधान परीषद विरोधी पक्षनेता धनंजय मुंढे, समाजवादी पक्षाचे अबु आजमी, आमदार जयंत पाटील,आमदार जितेंद्र आव्हाड, आमदार राजेश टोपे, आमदार अब्दुल सत्तार, आमदार सुनिल केदार, आमदार अमित झनक, आमदार वामनराव चटप,आमदार जयकुमार गोरे, आ. खाजा बेग, आ.यशोमतीताई ठाकुर, आ.डॉ. संजय टारपे, आ. राहुल मोटे, आ. विद्या ठाकुर, आ. हुस्न बानो मॅडम, आ. सुमनताई पाटील,  प्रदेश सरचिटणीस अ‍ॅड. गणेशराव पाटील, बुलडाणा जिल्हा कॉगे्रस कमिटीचे अध्यक्ष आमदार राहुलभाउ बोंद्रे, आमदार हर्षवर्धन सपकाळ, माजी आमदार डॉ. राजेंद्र शिंगणे, माजी आमदार दिलीपकुमार सानंदा,बाबुराव पाटील, रेखाताई खेडेकर, संजय राठोड, शाम उमाळकर, नरेंद्र खेडेकर, राष्ट्रवादीचे जिल्हाध्य क्ष नाजेर काझी, वामनराव जाधव, हसन देशमुख, यांचे सह संघर्ष यात्रा निघ्ाून दुपारी 2 वाजता चिखली येथे आली. आल्यानंतर या संघर्ष यात्रेचे चिखलीत जोरदार स्वागत करण्यात आले. यावेळी चिखलीत निघालेल्या कर्जमाफीसाठी टाळाटाळ करणार्‍या सरकारचा निषेध नोंदविण्यासाठी निघालेल्या या रॅलीत  हजारो मोटारसायकल, अ‍ॅटोव्दारे कॉगे्रस मित्र पक्षाचे सर्व जिल्हास्तरीय व तालुका स्तरीय पदाधिकारी, विविध सेलचे पदाधिकारी, व कार्यकर्ते सहभागी झाले होते. वरील सर्व मान्यवरांना टॅक्टरमध्ये बसवून निघालेली ही प्रचंड निषेध रॅलीतील वाहनावरील भारॉकॉचे व संघर्ष यात्रेचे ध्वज, फलक, मार्गातील सर्वाचे लक्ष वेधून घेत होते. संपुर्ण रॅलीचे मार्गावर पोलीसांनी चोख बंदोबस्त ठेवलेला होता.