Breaking News

डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी

बुलडाणा, दि. 17 - दरवर्षीप्रमाणे यंदाही आठवडी बाजार चिखली येथील एकता नगरमधील सर्व जातीधर्माच्या नागरिकांनी महात्मा फुले-डॉ.बाबासाहेब आंबेडकरांची 126वी जयंती अतिशय उत्साहात साजरी केली. 
यावेळी अभिवादन व धम्म ध्वजारोहण तसेच सामुहिक धम्मवंदना होवून दरवर्षीप्रमाणे यंदाही हजारो लोकांच्या भोजनदानाचा कार्यक्रम संपन्न झाला. सरकारी वकील आम्रपाली कस्तुरे पुणे व अ‍ॅड.रेखा हनमंते यांच्या हस्ते यावेळी भोजनदान करण्यात आले. यावेळी अ‍ॅड.विजयकुमार कस्तुरे यांनी आपले विचार प्रकट केले.  या कार्यक्रमाला नवनिर्वाचित महिला व बालकल्याण सभापती श्‍वेताताई महाले, चिखली अर्बनचे अध्यक्ष सतिश गुप्त, माजी नगराध्यक्ष सुरेशआप्पा खबुतरे, राजेंद्र व्यास, सुधीर लंके, नगरसेवक अनुप महाजन, सामाजिक कार्यकर्ते अशोक अग्रवाल, श्रीरंग पितळे, सरकारी वकील वैशाली कस्तुरे, महेश वाधवाणी, भगवान खरात, नजीर सेठ, भाई प्रदीप अंभोरे, अंगुलीमाल कस्तुरे, सौ.ज्योती कस्तुरे, बाबुराव सरदार, माजी उपाध्यक्ष कुणाल बोंद्रे, सुरेशआप्पा बोंद्रे, बहुजन साहित्य संघाचे सचिव मनोहर पवार तसेच बहुसंख्य नागरिक उपस्थित होते. कार्यक्रमासाठी एकता नगर जयंती उत्सव समितीचे सचिव सत्यविजय गवई, नवाबभाई, बावस्कर, डोंगरदिवे, अरूण घेवंदे, सौ.गवई व इतरांनी अथक परिश्रम घेतले.