भारत बांग्लादेशला जवळपास 30 हजार कोटींचं कर्ज देणार
नवी दिल्ली, दि. 09 - बांग्लादेशच्या पंतप्रधान शेख हसीना चार दिवसांच्या भारत दौर्यावर आहेत. आज या दौर्याचा दुसरा दिवस असून, आजच्या द्विपक्षीय चर्चेनंतर उभय देशांमध्ये 22 करारांवर स्वाक्षर्या झाल्या. यामध्ये आण्विक सहकार्य करारासह विविध सामरिक क्षेत्रातील करारांचा समावेश आहे.
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि बांग्लादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांनी आज विविध विषयांवर विस्तृत चर्चा केली. यामध्ये दोन्ही देशांचे संबंध अधिकाधिक वृद्धिंगत करण्यावर भर देण्यात आला. यानंतर पंतप्रधान मोदींनी बांग्लादेशला विविध योजनांसाठी 4.5 अब्ज डॉलर्सचं (भारतीय चलनानुसार साडे 29 हजार कोटी) कर्ज देण्याची घोषणा केली.
याशिवाय दोन्ही देशांमध्ये रेल्वे सेवा सुरु करण्यासही हिरवा कंदील दाखवला. ही नवी रेल्वे सेवा कोलकाता आणि बांग्लादेशमधील खुलना दरम्यान जुलैपासून सुरु होणार आहे. याशिवाय कोलकाता आणि खुलना दरम्यान बस सेवा सुरु करण्यावरही दोन्ही देशांमध्ये एकमत झालं. यावर पंतप्रधान मोदी म्हणाले की, ‘दोन्ही देशांमध्ये बस आणि रेल्वे सेवा सुरु झाल्यास दळणवळणाच्या माध्यमातून दोन्ही देशांना फायदा होईल.’ विशेष म्हणजे, बांग्लादेशला सैन्य पुरवठ्यासाठी 50 कोटी डॉलर्सचं कर्ज देण्याची घोषणा पंतप्रधान मोदींनी यावेळी केली. हा कर्जपुरवठा बांग्लादेशला गरजेनुसार करण्यात येणार असल्याचं मोदींनी यावेळी स्पष्ट केलं. तिस्ता पाणीवाटप प्रश्नावरील कराराच्या कार्यवाहीसंदर्भात तोडगा निघाला नाही. मात्र, हा मुद्दा दोन्ही देशांसाठी अतिशय महत्त्वाचा असल्याचं पंतप्रधान मोदी यावेळी नमुद केलं. तसेच भारत यासाठी वचनबद्ध असल्याचं आश्वासनही पंतप्रधान मोदींनी शेख हसीना यांना दिलं. या प्रश्नावर लवकरच तोडगा काढला जाईल, असंही मोदी यावेळी म्हणाले.