Breaking News

लातूर-उस्मानाबादच्या ग्रामीण भागात 10 रुपाचे चलन घेण्यास व्यापार्‍यांचा नकार,लोकांपुढे समस्या

लातूर (प्रतिनिधी), दि. 23 - लातूर आणि शेजारच्या उस्मानाबाद जिल्ह्यातील ग्रामीण भागामध्ये व्यापार्‍यांकडून दहा रुपयाचे चलन घेण्यास नकार देण्यात येत आहे, त्यामुळे जनतेपुढे समस्या निर्माण झाली आहे. चलन न स्विकारण्याचे नेमके कारणही व्यापारी सांगत नाहीत, उलट लोक घेत नाहीत म्हणून आम्हीही घेत नाही..असे सांगून नागरिकांची कोंडी करत आहेत, प्रशासनाने याबाबत उचित खुलासा करावा अशी मागणी होत आहे.
 दैनंदिन किरकोळ व्यवहारासाठी ग्रामीण असो शहरी नागरिक. सर्वांना पैसा लागतो.त्यासाठी सध्या 1,2,5 आणि 10 रुपयांचे चलन (नाणे)चलनात चालू आहे. तर कमीत कमी पाच रुपयांपासून  दहा, वीस ,पन्नास, शंंभर, पाचशे रुपयांंचे कागदी चलन व्यवहारासाठी भारतीय रिझर्व्ह बँकेने उपलब्ध करुन दिलेले आहे.मध्यंतरीच्या  आठ महिन्यांच्या नोटीबंदीने लोक हैराण होते, त्यांतून कुठे दिलासा मिळतो न मिळतो तोच आता गेली महिनाभरापासून लातूर आणि उस्मानाबाद जिल्ह्यातील शहरी तसेच ग्रामीण भागातही व्यापारी  दहा रुपयांचे चलनी नाणे व्यवहारात स्विकारत नाहीत, लोक घेत नाहीत म्हणून आम्ही घेत नाहीत असे सांगून हात वर करत आहेत, परिणामी सर्वसामान्याच्या लहान-सहान व्यवहारात अडसर होतो आहे.लातूरच्या गंंजगोलाईत तसेच इतर मार्केटमध्ये दहा रुपयाचे बंंदे घेतले जात नाहीत,आणि ठेास कारणही समजत नाही, नेमका हा खोडसाळपणे कशासाठी होतो आहे, या मागे काय षडयत्र आहे, याची चौकशी होणे आणि  दहा रुपयांचे चलन वापरात ठेवण्यास कसलीच अडचण नसल्याचे भारतीय रिझर्व्ह बँकेेने स्पष्ट करावे अशी मागणी सर्वसामान्यांतून होत आहे.