Breaking News

आजारी सोनियांना भेटण्यासाठी राहुल गांधी परदेशात

नवी दिल्ली, दि. 17 - आजारी सोनिया गांधींना भेटण्यासाठी काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी गुरुवारी अमेरिकेला रवाना झाले आहेत. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्यावर अमेरिकेत उपचार सुरु आहेत. त्यामुळे सोनियांवरील उपचारांदरम्यान राहुल गांधी त्यांच्यासोबत असतील, अशी माहिती काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी दिली आहे.
सोनिया गांधींची प्रकृती गेल्या काही दिवसांपासून ठीक नाही. त्यामुळेच त्या पाच राज्यांमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकांच्या प्रचारातही दिसल्या नाही. विधानसभा निवडणूक निकालाच्या आधीच त्या अमेरिकेला रवाना झाल्या होत्या. राहुल गांधी सोनियांसोबतच अमेरिकेहून परतणार आहेत. मात्र उत्तर प्रदेश आणि उत्तराखंडमधील पराभवानंतर राहुल गांधी परदेशात जात असल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.