कराड, दि. 11 (प्रतिनिधी) : येथील आदरणीय पी. डी. पाटील गौरव प्रतिष्ठानच्यावतीने रविवार, दि. 12 मार्च रोजी आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार, स्व. यशवंतराव चव्हाणसाहेब यांच्या 104 व्या जयंतीदिनी समाधीस्थळी, सकाळी 8:30 वाजता, कराड शहरातील 10 माध्यमिक शाळांचे सुमारे 12 हजार विद्यार्थी, शिक्षक व संगीतप्रेमी एक सूर-एक ताल या उपक्रमाद्वारे ’शब्द-सुरांची भावपूर्ण आदरांजली’ अर्पण करणार आहेत. या कार्यक्रमासाठी कराड व परिसरातील यशवंतप्रेमी नागरीकांनी बहुसंख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष डॉ. अशोकराव गुजर यांनी केले आहे.