तर लोकशाही मृत झाल्याचे चित्र भारत वर्षाच्या नशिबी!
दि. 18, मार्च - दोन वर्षापुर्वी सामान्य जनतेने पाहीलेले खरे तर दाखविलेले अच्छे दिनचे स्वप्न पुर्ण झाले की नाही यावर वादविवाद होऊ शकतो.माञ ज्यांनी हे स्वप्न दाखविले ते तमाम संघीय भाजपेयी आणि विशेषतः नरेंद्र मोदी व त्यांचे भक्त यांना माञ अच्छे दिन आलेत याविषयी कुठल्याही मत प्रणालीला तिळमाञ शंका नाही.या अच्छे दिनच्या प्राप्तीसाठी मंडळींनी उचलेले प्रत्येक पाऊल वादग्रस्त ठरल्याने भाजपाच्या कारभाराविषयी जनतेच्या मनात शंकेची पाल चुकचुकू लागली आहे.रोष निर्माण होऊन व्यक्त होऊ लागला आहे.प्रथम दर्शनी जनतेची मनात असलेली रास्त वाटत असल्याने भारतभर मोठे जनआंदोलन उभे राहण्याची शक्यता आहे.ही शक्यता वास्तव ठरली तर आणि तरच जनतेला अच्छे नसले तरी निदान जगण्याची शाश्वती देणारे बरे दिवस येतील.अन्यथा अच्छे दिनचे हे मृगजळ लोकशाही दीन करील.
केंद्रात भाजपा,राज्यात भाजपा, महापालिका, जिल्हा परिषदा, नगरपंचायत, नगरपरिषदा इतकेच नाही तर ग्रामपंचायत मध्येही भाजपा....! गल्लीपासून दिल्लीपर्यंत भारतीय जनता पक्ष एक एक गड सर करून कमळाची फुले पेरू लागला आहे.राज्यघटनेने दिलेल्या मुलभुत अधिकाराच्या सहयोगानेच हे सारं घडते आहे.काही वर्षापुर्वी कडवा,धर्मांध म्हणून हेटाळणी होणारा पक्ष भारताच्या धर्मनिरपेक्ष राजकारणात जवळपास अस्पृश्य मानला जात होता,तोच आज दक्षिणेचा एखाद दुसरा अपवाद सोडला तर भारतातील सर्वात प्रभावी राजकीय पक्ष म्हणून उदयास आला आहे.भाजपाचा हा प्रवास फार प्राचीन आहे असेही नाही.उण्यापुर्या पंचवीस वर्षात भाजपाने हे कमावल आहे.आणि आगामी पंचविस वर्षात हे सारं गमावलेलं देखील असेल हा भाग वेगळा .
भाजपाच्या या यशात संघ प्रणित थिंक टँकचा जेव्हढा वाटा आहे तेव्ढाच वाटा मुर्दाड जनतेचा आणि विरोधी राजकीय पक्षांचा आहे. भारतीय जनता सोशिक आहे.या जनतेने शेकडो वर्ष मुघलांची ,हजारो वर्ष धर्म मार्तंडांची आणि दिडशे वर्ष ब्रिटीशांची गुलामी सोसून जनतेच्या संवेदना बोथट नव्हे तर ठार झाल्यात,कातडी रठ झाली आहे.परिणामी या कातडीवर स्वकिय सत्ताधार्यांनी ओढलेले आसूड कुठल्या भावना उद्दीपित करीत नाहीत.नेमका त्याचाच फायदा साठ वर्ष काँग्रेसने घेतला.अन्याय अत्याचाराची मर्यादा संपल्यानंतर छोटीमोठी क्रांती होता असते .साठ वर्ष सत्ताधार्यांच्या बेलगाम कारभाराविरूध्द अधूनमधून समाजकारणातील मंडळी आवाज उठवत होती.त्याचा हळूहळू परिणाम होत होत दोन वर्षापुर्वी निर्माण झालेल्या सत्ता विरोधी लाटेवर भाजपा आयता स्वार झाला ,त्याचे सारथ्य नरेंद्र मोदी यांनी केले.त्यामागे देखील एक खेळी आहे.त्याचा परामर्श यथावकाश घेऊच.पण मोदींच्या खांद्यावर बंदूक ठेऊन काँग्रेसच्या गलथानपणावर अचूक निशाणा साधला.
सत्ता हस्तगत केली.जनतेच्या आशा आकांक्षांना पंख लावले,वेडी खुळी भाबडी जनता फसली.त्यांनी लावलेल्या पंखांवर भरवसा ठेऊन अच्छे दिनच्या शोधात अवकाश भरारी घेऊ लागली.काही अंतर उच गेल्या नंतर लक्षात आले,त्यांनी लावलेले पंख बनावट आहेत, कमकुवत आहेत.पंख निखळू लागलेत.उंचावर गेलेले कोसळू लागलेत.
थोडक्यात भारतीय जनता पक्षाने फसविले याची जाणीव भारतवासियांना आता होऊ लागली आहे.काँग्रेसपेक्षाही मोठा विश्वासघात भारतीय जनता पक्षाने केल्याची भावना जनमानसात रूजली आहे.मग वेगवेगळ्या प्रकारच्या वेगवेगळ्या प्रांतात होणार्या निवडणूकांमध्ये लोक भाजपाला मतं का देतात असा सोयीस्कर प्रश्न विचारला जातो,या बाबतीत भाजपा काँग्रेसपेक्षा एक पाऊल पुढचा निघिला हे या प्रश्नाचे उत्तर आहे.जे काँग्रेसने साठ वर्षात केले ते या मंडळींनी दोन वर्षात करून दाखविले.व्यवस्थेचा दुरूपयोग..व्यवस्थेला बटीक बनवून जनहिताला तिलांजली देत सत्तेचा भोग घेणार्या काँग्रेसला वैतागून जनतेने भाजपाला सत्ता दिली.भाजपाने दोनच वर्षात रंग दाखवून ढंग सुरू केले.स्वातंञ्यानंतरचा कारभार पाहून गोरे गेले काळे आले, इंग्रज परवडले पण काँग्रेस नको असे लोक बोलत होते.आज भाजपाचा कारभार पाहून लोक म्हणू लागलेत,काँग्रेस परवडली पण भाजपा नको.हाच रोष आता जनआंदोलनातून ठिकठिकाणी व्यक्त होऊ लागलाय.स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकीत महाराष्ट्रात आणि विधानसभा निवडणूकीच्या निमित्ताने उत्तर प्रदेश,उत्तराखंड राज्यात झालेला व्यवस्थेचा गैरवापर जनतेच्या नजरेत भरला आहे.तूया विरूध्द भुमिकाही घेतली आहे.माञ न्याय मिळेपर्यंत जनतेने ठाम आणि सोशिक असायला हवा अन्यथा लोकशाही मृत झाली हे चिञ पाहण्याचे दुर्भाग्य भारतवर्षाच्या नशिबी येईल.