भारताचं ऑस्ट्रेलियाला चोख प्रत्युत्तर, टीम इंडियाची 120 धावांपर्यंत मजल
रांची, दि. 17 - लोकेश राहुल आणि मुरली विजय यांनी दिलेल्या 91 धावांच्या सलामीच्या जोरावर टीम इंडियानं रांची कसोटीच्या दुसर्या दिवसअखेर एक बाद 120 धावांची मजल मारली आहे. दुसर्या दिवसाचा खेळ थांबला त्या वेळी मुरली विजय 42, तर चेतेश्वर पुजारा 10 धावांवर खेळत होता. लोकेश राहुलनं या मालिकेतलं सलग चौथं अर्धशतक साजरं केलं. त्यानं 102 चेंडूंत नऊ चौकारांसह 67 धावांची खेळी उभारली. पॅट कमिन्सच्या एका उसळत्या चेंडूवर त्यानं यष्टिरक्षक मॅथ्यू वेडच्या हाती झेल दिला.
त्याआधी, कर्णधार स्टीव्ह स्मिथनं ग्लेन मॅक्सवेलच्या साथीनं पाचव्या विकेटसाठी रचलेल्या 191 धावांच्या भागिदारीनं ऑस्ट्रेलियाला 451 धावांची मजल मारून दिली. ऑस्ट्रेलियाच्या डावात कर्णधार स्टीव्ह स्मिथनं नाबाद 178 धावांचं योगदान दिलं. ग्लेन मॅक्सवेलनं 104 धावांची खेळी उभारली. स्मिथ आणि मॅक्सवेलच्या जात्यात टीम इंडियाचं आक्रमण अक्षरश: भरडून निघालं. अखेर रवींद्र जाडेजाने मॅक्सवेलचा काटा काढून ही जोडी फोडली. त्याच जाडेजाने 124 धावांत पाच फलंदाजांना माघारी धाडलं. जाडेजानं सलग दुसर्या सामन्यात पाच गडी बाद करण्याची किमया केली आहे.