Breaking News

मध्य रेल्वेतर्फे खास उन्हाळ्यासाठी 82 जादा गाड्या

पुणे, दि. 02 - मध्य रेल्वेतर्फे खास उन्हाळ्याच्या सुट्यांत होणार्‍या गर्दीचा विचार करता 82 जादा गाड्या सोडण्यात येणार आहेत. ज्यामध्ये पुण्यासाठी पुणे-पटना, पुणे-तिरुनेलवेली, पुणे एरनाकुलम या गाड्यांचा समावेश आहे. या गाड्यांसाठी 3 मार्च (शुक्रवार) पासून सुरू होणार आहे. यामध्ये पुणे-पटना ही गाडी 7 एप्रिल ते 30 जून या कालावधीत धावणार आहे. ही गाडी पुण्याहून 10 वाजून 45 मिनिटांनी सुटेल तर दुसर्‍या दिवशी संध्याकाळी साडेसहा वाजता पटणाला पोहचते. दौंड, अहमदनगर, मनमाड, भूसावळ, बर्‍हानपूर, खांडवा, इटारसी, जबलूर, कटनी, सतना, मानिकपूर, छिवोकी, मुगलसराय, बक्सर, आरा, दानापूर येथे थांबा असेल. तर पटना-पुणे 7 एप्रिल ते 2 जुलै या कालावधीत धावणार आहे. ही गाडी पटनाहून सकाळी 6 वाजता निघेल तर पुण्याला दुस-या दिवशी दुपारी 2 वाजून 5 मिनिटांनी पोहोचेल. तर पुणे एरनॅकुलम ही गाडी साप्ताहिक असून ती 6 एप्रिल ते 8 जून या कालावधीत धावणार आहे. ही गाडी पुण्याहून दुपारी सव्वाचार वाजता सुटणार आहे. ती दुसर्‍या दिवशी रात्री सव्वाआठ वाजता एरनॅकुलमला पोहोचणार आहे. या गाडीचे लोणावळा, कल्याण, पनवेल, रोहा, खेड, चिपळून, रत्नागिरी, कनकवली, कुडाल, थीवीम, मडगाव, कारवार, कुमटा, भटकल, मुकामबिका रोड बैंदुर, कुन्दापुरा, उडुपी, मुलकी, सुरतकल, मंगलोर जंक्शन, कासरगोड, कन्नूर, थलास्सेरी, कोझीकोडे, तिरूर, शोरानूर जंक्शन, त्रिसूर, अलूवा, एरनाकुलम, असे थांबे असतील.