राहुरी पंचायत समितीच्या सभापतीपदी मनिषाओहोळ तर उपसभापतीपदी रविंद्र आढाव
अहमदनगर, दि. 15 - गेल्या महीनाभरा पासून प्रतिक्षेत असलेल्या राहुरी पंचायत समितीच्या सभापती पदी गुहा गणातील मनिषा अविनाश ओहोळ तर उपसभापती पदी आरडगाव गणातील रविंद्र गोकुळदास आढाव यांची निवड करण्यात आली.
महीनाभरा पूर्वी झालेल्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूकीमध्ये गुहा गणातून सौ. मनिषा अविनाश ओहोळ ह्या भरघोस मतांनी विजयी झाल्या होत्या. सभापती पद हे मागासवर्गीय महीला प्रवर्गासाठी राखीव करण्यात आले होते व गुहा गण हा मागासवर्गीय महीला राखीव झाल्याने संपूर्ण तालूक्याचे लक्ष गुहा गणाकडे लागले होते. या गुहा गणातून विजयी झालेला उमेदवार सभापती पदी विराजमान होणार हे निश्चितच होते. त्यामुळे गुहा गणात विखे गट व तनपूरे गटात मोठी रस्सीखेच सुरू होती. त्यामधून सौ. मनिषा अविनाश ओहोळ यांनी बाजी मारल्याने सभापती पदी त्यांची वर्णी लागणार हे जवळपास निश्चितच होते. अखेर दिनांक 14 मार्च रोजी दुपारी निवडणूक निर्णय अधिकारी गोपिचंद व सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी अनिल दौंडे, गटविकास अधिकारी ईशाधीन शेळकंदे यांच्याकडे दुपारी एक वाजे पर्यंत सभापती पदासाठी मनिषा ओहोळ व उपसभापती पदासाठी रविंद्र आढाव यांचे अर्ज दाखल झाले होते. त्यानंतर दुपारी साडेतीन वाजता निवडणूक निर्णय अधिकारी गोपिचंद कदम यांनी सभापती पदासाठी सौ. मनिषा ओहोळ तर उपसभापती पदासाठी रविंद्र आढाव यांची निवड जाहीर केली. सदर दोन्ही पदे राष्ट्रवादीच्या ताब्यात राहील्याने राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी मोठा जल्लोष केला. यावेळी माजी खासदार प्रसाद तनपूरे, माजी सभापती शिवाजी गाडे, तनपूरे कारखान्याचे चेअरमन उदयसिंह पाटील, बेबीताई सोडनर, सुरेश वाबळे, सुरेंद्र थोरात, निर्मला मालपाणी, सुनिताताई निमसे, वैशाली अंत्रे, प्रदिप पवार, सुरेश बानकर, कमलताई लोंढे आदि उपस्थित होते. यावेळी पिठासीन अधिकारी म्हणून गोपिचंद कदम यांनी काम पाहीले.