श्री विश्वेश्वर नाथबाबांच्या त्रिदिनात्मक पुण्यतिथी सोहळयास धर्मध्वजारोहनाने प्रारंभ
अहमदनगर, दि. 15 - श्री समर्थ सदगुरु किसनगिरी बाबा यांचे गुरु व संत श्री साईंबाबांचे गुरुबंधु असलेल्या श्री विश्वेश्वर नाथबाबांच्या त्रिदिनात्मक पुण्यतिथी सोहळयास सोमवार दि.13 मार्च पासून धर्म ध्वजारोहनाने नेवासा बुद्रुक येथे उत्साहात प्रारंभ झाला.
याप्रसंगी प्रवरानदी काठी असलेल्या श्री विश्वेश्वर नाथबाबा यांच्या समाधीसह मूर्तीला अभिषेक घालण्यात आला.यावेळी मंदीर विश्वस्त सरपंच आन्नाभाऊ पेचे,उपसरपंच भानुदास रेडे,ज्ञानेश्वर जायगुडे,पारायण व्यासपीठ प्रमुख कारभारी डोहाळे यांच्या हस्ते धर्मध्वजाचे विधिवत पूजन करण्यात आले.ग्रामपुरोहीत लालागुरु जोशी यांनी धार्मिक कार्यक्रमाचे पौरोहित्य केले.
यावेळी प्रभाकर जायगुडे,माजी सरपंच बाबा कांगुणे,बाळासाहेब शिंदे,नितीन पवार,सोपान शेंडे,मोहनराव जायगुडे, शंकर परदेशी,दिनकर कोल्हे,दिलीप दळवी,रामेश्वर जपे,संदीप बोरकर, शामराव ठाणगे,अशोक जाधव, पुजारी ज्ञानेश्वर सुरोशे,आचारी किशोर गावडे,संजय कुटे पाटील यांचेसह गाडगेबाबा भजनी मंडळ,देवगड भजनी मंडळ,नाथबाबा तरुण मंडळाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सोमवार पासून झालेल्या त्रिदिनात्मक सोहळया मध्ये पहाटे 4 ते 6 काकड़ा भजन,सकाळी 7 ते 11 ज्ञानेश्वरीतील अठराव्या अध्यायाचे पारायण,दुपारी 4 ते 5 प्रवचन, सायंकाळी 5 ते 6 हरिपाठ,रात्री 8 ते 10हरिकीर्तन असे कार्यक्रम होणार आहे.
बुधवार दिनांक 15 मार्च रोजी सकाळी 9 ते 11यावेळेत गुरुवर्य भास्करगिरी महाराज यांच्या होणार्या काल्याच्या किर्तनाने या सोहळयाची सांगता होणार असून भाविकांनी त्रिदिनात्मक सोहळयानिमित्त आयोजित पारायण सोहळयातील प्रवचन व कीर्तनाचा लाभ घ्यावा असे आवाहन संयोजन समितीच्या वतीने करण्यात आले आहे.