राष्ट्रवादीचा बीडमधील झेडपी सदस्यांना व्हीप
बीड, दि. 21 - माजी मंत्री सुरेश धस यांच्या भूमिकेनंतर राष्ट्रवादी काँग्रेसने बीड जिल्हा परिषद सदस्यांसाठी व्हीप जारी केला आहे. पक्षविरोधी मतदान केल्यास कारवाईला सामोरं जावं लागेल, असा इशारा राष्ट्रवादीने सदस्यांना दिला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री सुरेश धस यांची विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांच्याविषयी असलेली नाराजी पक्षाला चांगलीच महागात पडण्याची शक्यता आहे. कारण सुरेश धस यांनी आपले पाच सदस्य भाजपला पाठिंबा देणार असल्याचं जाहीर केल्याची माहिती आहे.
बीड जिल्ह्याचं नेतृत्व म्हणून धनंजय मुंडे आणि अमरसिंह पंडित यांनाच पक्षाकडून बळ दिलं जात असल्याचा धस यांचा आरोप आहे. जिल्ह्यात राष्ट्रवादीचे सदस्य निवडून आणण्यात धस यांचाही मोठा वाटा आहे. धनंजय मुंडे यांचं नेतृत्व सुरेश धस यांना मान्य नसल्याचं बोललं जात. त्यामुळेच त्यांनी धनंजय मुंडे यांना आव्हान दिल्याची चर्चा आहे.
राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष डॉ. भारतभूषण क्षीरसागर यांनी जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा रात्री उशीरा दिल्याची माहिती आहे. राष्ट्रवादीने बीड पंचायत समितीमध्ये संदीप क्षीरसागर यांच्या नावे व्हीप बजावून क्षीरसागरांना घरातूनच आव्हान निर्माण केलं होतं. याचाच राग म्हणून भारतभूषण यांनी राजीनामा दिला असल्याचं बोललं जात आहे.