Breaking News

डॉक्टरांच्या सामूहिक रजेचा दुसरा दिवस

मुंबई, दि. 21 - डॉक्टर मारहाणीच्या निषेधार्थ निवासी डॉक्टरांच्या सामूहिक रजेचा आज दुसरा दिवस आहे. मुंबईच्या सायन रुग्णालयात डॉक्टरला झालेल्या मारहाणीविरोधात डॉक्टरांनी कामबंद आंदोलन पुकारलं आहे. डॉक्टरांच्या संपामुळे रुग्णांचे मात्र प्रचंड हाल सुरु आहेत. हॉस्पिटलबाहेर रुग्णांच्या रांगा मोठ्या लागल्या आहेत.
दुसरीकडे डॉक्टरांच्या सामूहिक रजेविरोधातील याचिकेवर आज मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. निवासी डॉक्टरांचा संप बेकायदेशीर असून सामूहिक रजेवर जाऊन डॉक्टरांनी कोर्टाचा अवमान केला, असा दावा याचिकेत केला आहे. दरम्यान निवासी डॉक्टर नियमांनुसार कामावर रुजू झाले नाहीत तर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा मुंबईचे महापौर विश्‍वनाथ महाडेश्‍वर यांनी दिला आहे.