कृष्णा रामदास दळवी यांची विक्रीकर निरीक्षक पदी निवड
अहमदनगर, दि. 11 - 8 नोव्हेंबर 2016 रोजी झालेल्या महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या विक्रीकर निरीक्षक पदासाठी झालेल्या निवड परिक्षेमध्ये कृष्णा दळवी यांनी सहभाग घेवुन पुर्व परिक्षेमध्ये चांगले मार्क मिळवुन मुख्य परीक्षेसाठी स्थापन मजबुत केले. हजारोंच्या संख्येने लोकसेवा आयोगाच्या परिक्षेत बसलेल्या परीक्षार्थीमध्ये एकूण 62 जागांसाठी 62 विद्यार्थ्याची निवड करण्यात आली. यामध्ये कृष्णा दळवी पहील्या 14 व्या क्रमांकावर राहून विक्रीकर निरीक्षक पदी निवड झाली. कृष्णा विक्रीर निरीक्षक म्हणून निवड झाली. याबद्दल त्यांचे मिरजगांवचे सरपंच नितीन खेतमाळीस, अमृत लिंगडे, गुलाबराव तनपुरे, डॉ.पंढरीनाथ गोरे, प्रशांत बुध्दीवंत, सारंग घोडेसवार यांनी अभिनंदन केले.
