Breaking News

शिक्षकांनी समर्पित भावनेने विद्यार्थ्यांना घडवावे-प्राचार्य केंद्रे

लातूर, दि. 17 - आजचे विद्यार्थी उद्याचे भारताचे भवितव्य आहेत. ते प्राथमिक पाया मजबूत होवून स्वत:च्या पायावर उभे राहिले पाहिजे, यासाठी शिक्षकांनी त्यांना समर्पित भावनेने उत्तम नागरिक घडवावे असे मत राजमाता जिजामाता शैक्षणिक संकुलाचे सचिव प्राचार्य डी.एन. केंद्रे यांनी येथे बोलताना व्यक्त केले. 
राजमाता जिजामाता विद्यालयातील पहिली ते सातवीतील निबंध स्पर्धेतील विजेत्या विद्यार्थ्यांना पारितोषिक वितरण करताना प्राचार्य केंद्रे बोलत होते. याप्रसंगी प्राचार्य संगमेश्‍वर केंद्रे, प्रा. वैशाली केंद्रे, मुख्याध्यापक आर.पी. मुंडे आदिंची प्रमुख उपस्थिती होती. याप्रसंगी पहिलीतील निबंध स्पर्धेतील विजेेते पार्थ दयानंद भरे, शंतनू मनोज कुशळे, दुसरीतील सिमरन गफार गिड्डे, वैभव उमाकांत केंद्रे, शैलेश नागेश होटे,  इ. 3 री तील नाहेदाबानू खुनमीर भुगले, भक्ती किशोर पाटील, किशोरी दत्तात्रय सुर्यवंशी, इ. 4 थी तील आर्यन बाळासाहेब गायकवाड, व्यंकटेश प्रभाकर उटगे, कृष्णा खंडेराव तेलंगे, इ. 5 वी तील भीमसागर लक्ष्मण सुतार, सिमरन रफीक हन्नुरे, निर्जला संतोष टप्पेकर, इ. 6 वी तील छकुली सतीश चापलवार, सानिया चाँदपाशा हन्नुरे, नंदिनी किशोर सुर्यवंशी, इ. 7 वीतील वैष्णवी संजय लहाने, शबनम गफार गिड्डे, नंदिनी ज्ञानेश्‍वर बिरादार यांना  पॅड, वही, पेन हे पारितोषक देऊन व त्यांच्या पालकांना शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देवून गौरविण्यात आले.
शिक्षकांनी त्यागाच्या भावनेतून विद्यार्थ्यांना स्वत:चे मुल व दैवत समजून शिक्षण देण्याबरोबरच त्यांच्या उत्तम संस्कार करावेत, असे नमुद करून प्राचार्य डी.एन. केंद्रे म्हणाले की, डॉक्टर, इंजिनिअर होण्याकडे असलेला विद्यार्थ्यांचा कल आता बदलतो आहे. विद्यार्थी स्पर्धात्मक परीक्षेकडे वळत आहेत. त्यात ते यशस्वी व्हावेत यासाठी शिक्षकांनी त्यांना घडवावे व पालकांनीही आपल्या मुलांवर लक्ष केंद्रीत करण्याची गरज असल्याचे ते म्हणाले.
याप्रसंगी प्राचार्य संगमेश्‍वर केंद्रे, प्रा. वैशाली केंद्रे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. मुख्याध्यापक आर.पी. मुंडे प्रास्तावीकपर मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमास शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी, पालक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन मीरा चाटे यांनी केले. रमाकांत साबदे यांनी आभार मानले.